निधन वार्ता
प्रेस मालक…जोशी यांचे निधन

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील भारत प्रेसचे मालक स्व.प्रभाकर दत्तात्रयपंत जोशी (वय-८६) यांचे नुकतेच वृद्धापकाळाने गुरुवार निधन झाले आहे.त्यांचे पश्चात पत्नी,तीन मुले,दोन मुली,जावई नातू असा परिवार आहे.भारत प्रेसचे संचालक रविंद्र,संदिप,मिलिंद यांचे ते वडील होते.
स्वातंत्र्यपुर्व काळातील जुने मामलेदार (तहसिलदार) दत्तात्रय जोशी यांचे ते सुपुत्र होते.उत्तर नगर जिल्ह्यातील भारत प्रेस हे पहिले मुद्रणालय दत्तात्रय जोशी यांनी सुरू केले.धार्मिक आणि सामाजिक कार्याबद्दल दत्तात्रय गंगाधरपंत जोशी यांना शंकराचार्य यांनी “धर्मभूषण” या उपाधीने सन्मानित केले होते.
धर्मभूषण दत्तात्रय जोशी यांचा सामाजिक सत्कर्माचा वारसा त्यांचे सुपुत्र प्रभाकर जोशी यांनी समर्थपणे चालविला.स्व.प्रभाकर जोशी हे आप्तेष्ट स्नेहपरिवारात “आप्पा” नावाने परिचित होते.त्यांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.