निधन वार्ता
सोन्याबाई थोरात यांचे निधन

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
जवळके येथील रहिवासी असलेल्या व जवळके ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय साहेबराव थोरात यांच्या आत्या सोन्याबाई आप्पासाहेब गडाख (वय-७४) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात दोन मुली,जावई,नातवंडे असा परिवार आहे.त्यांच्या निधनाने जवळके व परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
स्व.सोन्याबाई गडाख या अत्यंत धार्मिक व मनमिळाऊ म्हणून कोपरगाव व परिसरात प्रसिद्ध होत्या.त्यांच्यावर जवळके येथील अमरधाम येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.
सदर प्रसंगी निळवंडे कालवा कृती समितीचे संस्थापक व पत्रकार नानासाहेब जवरे,माजी सरपंच वसंत थोरात,बंडोपंत थोरात,भिवराज शिंदे,माध्यमिक शिक्षक संघटनेचे माजी अध्यक्ष बापूसाहेब थोरात आदींसह मान्यवर बहु संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.त्या स्व.रंगनाथ थोरात यांच्या भगिनी होत्या.