निधन वार्ता
को.सा.का.चे माजी संचालक रोहमारे यांचे निधन

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाण्याचे माजी संचालक संजय रामराव रोहमारे (वय-५२) यांचे नुकतेच आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास दीर्घ आजाराने निधन झाले आहे.त्यांच्या पच्छात आई,दोन भाऊ,पत्नी,दोन मुले असा परिवार आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.ते कर्मवीर शंकरराव काळे कारखाण्याचे विद्यमान संचालक सचिन रोहमारे यांचे जेष्ठ बंधू होते.व माजी आ.अशोकराव काळे यांचे विश्वासू सहकारी होते.त्यांच्या निधनाबाबत माजी आमदार अशोक काळे,साई संस्थानचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी दुःख व्यक्त केले आहे.
स्व.संजय रोहमारे हे मितभाषी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जात.ते संजीवनी सहकारी साखर कारखाण्याचे सन-१९९५ ते २००० या पाच वर्षाच्या कालावधीत तर कोपरगाव सहकारी साखर कारखाण्याचे ते सन-२००० ते २०१० या कालावधीत दहा वर्ष संचालक होते.मात्र स्व.माजी आ.दादा पाटील रोहमारे यांचे माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचेशी आमदारकीच्या उत्तरार्धात वैचारिक पातळीवर बिनसल्या मुळे त्यांनी माजी शंकरराव काळे गटात प्रवेश केला होता.त्यावेळी संजय रोहमारे यांचाही काळे गटात आपोआप प्रवेश झाला होता.
स्व.संजय रोहमारे हे मितभाषी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जात.ते संजीवनी सहकारी साखर कारखाण्याचे सन-१९९५ ते २००० या पाच वर्षाच्या कालावधीत तर कोपरगाव सहकारी साखर कारखाण्याचे ते सन-२००० ते २०१० या कालावधीत दहा वर्ष संचालक होते.मात्र स्व.माजी आ.दादा पाटील रोहमारे यांचे माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचेशी आमदारकीच्या उत्तरार्धात वैचारिक पातळीवर बिनसल्या मुळे त्यांनी माजी शंकरराव काळे गटात प्रवेश केला होता.त्यावेळी संजय रोहमारे यांचाही काळे गटात आपोआप प्रवेश झाला होता.ते खा.माजी आ.स्व. दादा पाटील रोहमारे यांचे नातू व पोहेगाव येथील राजकीय दृष्ट्या महत्वाच्या असणाऱ्या स्व.माजी आ.दादासाहेब रोहमारे पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष व विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे माजी अध्यक्ष होते.त्यांच्यावर आज सायंकाळी ०६ वाजता पोहेगाव येथील अमर धाम येथे अंत्यसंस्कार संपन्न होणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे.