निधन वार्ता
प्रभाकर काळे (सर) यांचे निधन
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील “काळे इंग्लिश क्लासेस”चे संचालक प्रभाकर पांडुरंग काळे (वय-६८) यांचे नुकतेच दीर्घ आजाराने निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात दोन मुले,पत्नी,दोन भाऊ असा परिवार आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.त्यांच्यावर कोपरगाव येथील अमर धाम येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
कोपरगाव शहरात स्व.पांडुरंग काळे यांनी प्रारंभी रयत शिक्षण संस्थेच्या कोपरगाव शाखेत एक वर्ष विद्या दानाचे काम केले त्या नंतर शारदा इंग्लिश मिडीयम स्कुल येथे दहा वर्षे आपली सेवा बजावली होती.त्या नंतर त्यांनी कापड बाजारात १९७९ साली कोपरगाव शहरातील “काळे इंग्लिश क्लासेस”ची स्थापना करून अविरत सेवा बजावली ती २०१३ पर्यंत सुरू होती.
त्यांचा कोपरगाव शहर व तालुक्यात मोठा विद्यार्थी वर्ग आहे.ते अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचे म्हणून शहरात प्रसिद्ध होते.त्यांचे मूळ गाव श्रीरामपूर तालुक्यातील पढेगाव (लाख) हे असून येथील मूळ रहिवासी होते.
ते साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांचे निष्ठावान सहकारी डॉ.अनिरुद्ध काळे यांचे पिताश्री होते.