निधन वार्ता
अड.संचेती यांना मातृशोक
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव वकील संघाचे माजी उपाध्यक्ष अड.नरेंद्र संचेती यांच्या मातोश्री बसंताबाई पोपटलालजी संचेती (वय-८६) यांचे नुकतेच राहत्या घरी तेली गल्ली येथे वृद्धापकाळामुळे निधन झाले आहे.त्यांच्या पच्छात तीन मुले,दोन मुली,असा परिवार आहे.
स्व.बसंताबाई संचेती या अत्यन्त धार्मिक व मनमिळाऊ स्वभावाच्या म्हणून कोपरगाव परिसरात प्रसिद्ध होत्या.त्यांचे नुलतेच वृद्धापकाळामुळे निधन झाले आहे.
त्यांच्या निधनाबद्दल कोपरगाव नगरपरिषदेचे माजी अध्यक्ष विजय वहाडणे,सुनील बंब,वकील संघाचे अध्यक्ष विद्यासागर शिंदे,जैन समाजाचे पंच प्रवीण दोषी आदींनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.