जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निधन वार्ता

कॉ.रामदास बांद्रे यांचे निधन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

महाराष्ट्र राज्य खंडकरी शेतकरी संघटनेचे श्रीरामपूर तालुक्यातील उंदीरगाव येथील नेते कॉम्रेड रामदास पा.बांद्रे (वय-९०) यांचे आज सकाळी ५.४५ वाजेच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले आहे.त्यांच्या पच्छात एक मुलगा,चार मुली,नातू पणतू असा मोठा परिवार आहे.त्यांच्या निधनाने शेतकरी वर्गाची व कम्युनिस्ट चळवळीची खूप मोठी हानी झालेली आहे.

राज्यातील खंडकरी शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून त्यांनी १९५२ साली तत्कालीन आ.कॉ.माधवराव गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली व आण्णासाहेब पा.थोरात यांच्या साथीने खंडकरी शेतकऱ्यांची चळवळ उभी केली होती.पुढे ती संपूर्ण महाराष्ट्रात पसरली होती.त्यांनी सतत संघर्ष करित शेतकऱ्यांना जमिनी परत मिळवून दिल्या.स्वतः ची एक गुंठाही जमीन नसताना,आयुष्यभर खंडऱ्यांसाठी लढत होते.त्यांचा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना गौरव केला होता.

त्यांच्यावर उंदीरगाव येथे आज सकाळी १० वाजता रहात्या वस्तीवर मान्यवरांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार संपन्न झाला आहे.ते उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खण्डपीठातील वकील शिवराज कडू यांचे आजोबा होते.
राज्यातील खंडकरी शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून त्यांनी १९५२ साली तत्कालीन आ.कॉ.माधवराव गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली व आण्णासाहेब पा.थोरात यांच्या साथीने खंडकरी शेतकऱ्यांची चळवळ उभी केली होती.पुढे ती संपूर्ण महाराष्ट्रात पसरली होती.त्यांनी सतत संघर्ष करित शेतकऱ्यांना जमिनी परत मिळवून दिल्या.स्वतः ची एक गुंठाही जमीन नसताना,आयुष्यभर खंडऱ्यांसाठी लढत राहिले.त्यांच्या योगदानाबद्दल तत्कालीन मुख्यमंत्री पुथ्वीराज चव्हाण यांनी त्यांचा गौरव केला होता.त्यांच्या निधनाने शेतकरी वर्गाची व उरल्यासुरल्या कम्युनिस्ट चळवळीची खूप मोठी हानी झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close