निधन वार्ता
शिक्षक नेते माळवे यांना मातृशोक

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील सांगवी भुसार येथील मूळ रहिवासी व सदिच्छा शिक्षक मंडळाचे नेते,जिल्हा शिक्षक बँकेचे माजी संचालक ज्ञानेश्वर माळवे यांच्या मातोश्री द्वारकाबाई शामराव माळवे यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले आहे.
स्व.द्वारकाबाई माळवे या अत्यन्त धार्मिक व मनमिळाऊ स्वभावाच्या म्हणून पसिद्ध होत्या.त्यांनी आपल्या ऐन उमेदीच्या काळात पतीच्या निधनानंतर अत्यन्त प्रतिकूल काळात आपल्या मुलांचे संगोपन करून त्यांना उच्च शिक्षित केले.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.त्यांच्या पच्छात दोन मुले,दोन मुली असा परिवार आहे.त्या अत्यन्त धार्मिक व मनमिळाऊ स्वभावाच्या म्हणून पसिद्ध होत्या.त्यांनी आपल्या ऐन उमेदीच्या काळात पतीच्या निधनानंतर अत्यन्त प्रतिकूल काळात आपल्या मुलांचे संगोपन करून त्यांना उच्च शिक्षित केले.
त्यांच्यावर कोपरगाव गोदावरी तीरावरील अमर धाम मध्ये शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.