निधन वार्ता
सुखदेव थोरात यांचे निधन
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
निळवंडे कालवा कृती समितीचे जवळके येथील जेष्ठ कार्यकर्ते ग्रामपंचायतीच्या माजी सदस्या चंद्रकला थोरात यांचे पती सुखदेव सोपान थोरात (वय-६०) यांचे आज पहाटे दोन वाजेच्या सुमारास हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे.त्यांच्या पच्छात पत्नी,दोन मुले,दोन मुली असा परिवार आहे.त्यांच्यावर जवळके येथील स्मशान भुमित आज सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
स्व.सुखदेव थोरात हे अत्यन्त मनमिळाऊ व विनम्र स्वभावाचे म्हणून निळवंडे कार्यक्षेत्रात व परिसरात प्रसिद्ध होते.त्यांनी निळवंडे कालवा कृती समीतीच्या माध्यमातून कालव्यांच्या लढ्याला मोठी साथ दिली होती.तळेगाव दिघे,पिंप्री निर्मळ,कोपरगाव,राहाता,संगमनेर आदी ठिकाणच्या लढ्यात त्यांचे योगदान मोठे होते.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
स्व.सुखदेव थोरात हे अत्यन्त मनमिळाऊ व विनम्र स्वभावाचे म्हणून निळवंडे कार्यक्षेत्रात व परिसरात प्रसिद्ध होते.त्यांनी निळवंडे कालवा कृती समीतीच्या माध्यमातून कालव्यांच्या लढ्याला मोठी साथ दिली होती.तळेगाव दिघे,पिंप्री निर्मळ,कोपरगाव,राहाता,संगमनेर आदी ठिकाणच्या लढ्यात त्यांचे योगदान मोठे होते.त्यांच्या मुलीच्या लग्नात जनजागृती करण्यात त्यांनी सर्व प्रथम मान्यता देऊन योगदान दिले होते.त्यांच्या निधनाने अनेकांना धक्का बसला आहे.त्यांच्यावर अनेकांच्या उपस्थितीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.त्यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते.
त्यांच्या निधनाने निळवंडे कालवा कृती समितीचे मार्गदर्शक नानासाहेब जवरे,समितीचे विधी सल्लागार व राज्य शेतकरी संघटनेचे युवा आघाडीचे प्रदेश अध्यक्ष अड्,अजित काळे,अध्यक्ष रुपेंद्र काले,जेष्ठ नेते नानासाहेब गाढवे,गंगाधर रहाणे,कार्याध्यक्ष मच्छीन्द्र दिघे,उपाध्यक्ष संजय गुंजाळ,सोन्याबापू उऱ्हे सर,जनमंगल ग्रामविकास संस्थेचे अध्यक्ष उत्तमराव थोरात,माजी उपाध्यक्ष विश्वनाथ थोरात,माजी सरपंच वसंत थोरात,बंडोपंत थोरात,सोपान थोरात,उपसरपंच विजय थोरात आदींनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.