निधन वार्ता
रंगनाथ बोरकर यांचे निधन
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव नजीक असलेल्या संजीवनी सहकारी साखर कारखान्याचे भांडार विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी रंगनाथ मारुती बोरकर (वय-७२) यांचे नुकतेच कोपरगाव येथे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे.त्यांच्या पच्छात पत्नी,एक मुलगा,दोन मुली,सून,नातवंडे असा परिवार आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
स्व.रंगनाथ बोरकर हे संजीवनी साखर कारखान्यातील भांडार विभागातून २०१० साली सेवानिवृत्त झाले होते.ते सार्वजनिक बांधकाम विभागाचे पैठण येथील सहाय्यक अभियंता राजेंद्र बोरकर यांचे पिताश्री होते.