निधन वार्ता
तडकनाथ महाराज अनंतात विलीन
जनशक्ती न्यूजसेवा
संवत्सर-(प्रतीनिधी)
कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथील मूळ रहिवाशी हभ.प.तडकनाथ महाराज (वय-५२) यांचे नुकतेच हृदय विकाराच्या आजाराने निधन झाले आहे.त्यांच्या पच्छात दोन मुले,एक मुलगी असा परिवार आहे.त्यांच्यावर नगर येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,”सन १९९६ साली त्यांनी लखनगिरी महाराज यांच्याकडून नाथ धर्माची दीक्षा घेतली होती.ते त्या नंतर माधुकरी मागून आपला जीवन निर्वाह करीत असत.ते भागवत धर्माला व नाथ धर्माला मानणारे होते.व त्या भजन कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रमात नेहमी हिरहिरीने सहभागी घेत असत.त्यांची कन्या आनंद ऋषी हॉस्पिटल येथे वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहे.तर दुसरी मुलगी नुकत्याच संपन्न झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सदस्य म्हणून निवडून आलेली आहे.
त्यांच्या निधनाबद्दल गोदावरी परजणे दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे,जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे,संवत्सर ग्रामपंचायतीच्या सरपंच सुलोचना ढेपले,उपसरपंच विवेक परजणे,आदींनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.