निधन वार्ता
अड्.जाधव यांचे निधन
जनशक्ती न्यूजसेवा
माहेगाव देशमुख-(वार्ताहर)
कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख येथील प्रगतशील शेतकरी व अॕडहोकेट निवृत्ती लक्ष्मण जाधव (वय-८१) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. त्यांच्या मागे एक मुलगा,एक मुलगी,सून,नातवंडे असा मोठा परिवार आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
माहेगाव देशमुख विकास सोसायटी चे माजी उपाध्यक्ष सुनील जाधव यांचे ते वडील होते.त्यांच्यावर माहेगाव देशमुख येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.