निधन वार्ता
सोपान काका करंजीकर अनंतात विलीन
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-संवत्सर-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील करंजी येथील मूळ रहिवाशी व राज्यात प्रसिद्ध असलेले कीर्तन व प्रवचनकार ह.भ.प.सोपान काका करंजीकर वय-(८२) यांचे नुकतेच महानिर्वाण झाले असून त्यांच्यावर करंजी येथील वैकुंठधाम येथे अखेरचा दंडवत भाविकांनी घातला आहे.त्यांच्या निधनाने अनेकांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.त्यांच्या पच्छात तीन भाऊ,एक बहिण असा परिवार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आजुळाच्या वंशजातील फलटणच्या महाराणी यांनी आपल्या फलटणच्या संस्थानास एक निस्पृह महाराज दत्तक म्हणून मिळावे मागणी केली होती.त्यावेळी आळंदीच्या जोग महाराजांच्या संस्थेने व प्राचार्य मामासाहेब दांडेकर यांनी ह.भ.प.सोपान काका यांची शिफारस केली होती.त्यावेळी त्यांनी दिलेले उत्तर त्यांच्या संत परंपरेची झलक दाखविणारे ठरले होते.
वैकुंठवासी ह.भ.प.सोपान काका करंजीकर यांचे मूळ गाव हे करंजी हे होते तर त्यांनी प्रथम सराला बेटांचे महंत व त्या काळचे मठाधीपती सोमेश्वरगिरीजी महाराज यांच्या सहवासात साधारण १९५४ च्या सुमारास आले होते.व त्यांचा अनुग्रह घेतला होता.आपले अध्यात्मिक शिक्षण हे प्रख्यात कीर्तनकार जोग महाराज यांच्या शिक्षण संस्थेत घेण्यासाठी त्यांनी १९५६ साली आळंदी गाठली होती.या शिक्षण संस्थेत त्यांनी त्या ठिकाणी खानावळीची सोय नसल्याने माधुकरी मागून आपले शिक्षण पूर्ण केले होते.त्या संस्थेतिल अन्न कोठीचे नियंत्रण समीतीचे प्रमुखपद त्यांच्या हाती अनेक वर्ष नंतर मठाने सोपवले होते.शिक्षण घेणाऱ्या सुमारे २५० विद्यार्थ्यांत त्यांनी त्या काळी पहिला क्रमांक मिळवून आपले अध्यात्मिक क्षेत्रातील प्रभुत्व दाखवून दिले होते.त्या नंतर ते काही काळ आळंदी सोडून त्यांनी पुण्यातील निवडुंग विठोबा मंदिरात काही काळ आश्रय घेतला होता व तेथे त्यांनी हिंदी भाषेचे धडे गिरवले होते.त्यात त्यांनी विशेष प्राविण्य संपादन केले होते.व त्यात त्यांना आपल्या बुद्धीच्या जोरावर अनेक पुरस्कार प्राप्त झाले होते.त्यानंतर त्यांनी पांडुरंगाच्या पंढरीत प्रस्थान ठेवले होते.व तेथे त्यांनी बारा वर्ष म्हणजेच एक तप बंकटस्वामी आश्रमात आपला चातुर्मास पूर्ण केला होता.तेथून त्यांनी आपल्या मातृभूमीत १९६५ च्या सुमारास प्रस्थान करून आपल्या मातृभूमीच्या ऋणातून उत्तराई होण्याचा प्रयत्न केला होता.त्यांनी आजीवन व्रत पाळून आपल्या किर्तनसेवेचे कधीही मोल करून घेतले नाही.व ते आजीवन व्रतस्थपणे सांभाळले होते.ते आजीवन ब्रम्हचारी राहिले.थोड्याच दिवसात त्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आजोळच्या वंशजातील फलटणच्या महाराणी यांनी दत्तक घेण्याची तयारी दर्शवली होती.आपल्या फलटणच्या संस्थेत एक निस्पृह महाराज हा लौकिक प्राप्त झाल्यावर मागणी केली होती.त्यावेळी आळंदीच्या प्रसिद्ध जोग महाराजांच्या संस्थेने ह.भ.प.सोपान काका यांची शिफारस केली होती.त्यावेळी प्राचार्य मामा दांडेकर यांनी सोपान काका यांची शिफारस केली होती.त्यावेळी त्यांनी दिलेले उत्तर त्यांच्या व्यक्तिमत्वाची झलक दाखविणारी ठरली होती.त्यांनी,”दिवट्या छत्री घोडे,हे आम्हा न बऱ्यात पडे” असे स्वाभिमानी उत्तर दिले होते.व आम्हाला संत नामदेव महाराज यांनी सुरु केलेले व पुढे जोग महाराज व प्राचार्य मामासाहेब दांडेकर यांनी निस्वार्थपणे चालवलेले आपले,”कीर्तनाचे रंगी रंगण्याचे” कार्यच पुढे चालू ठेवायचे असल्याचे निवेदन केले होते.व त्यांनी हा किर्तरूपी यज्ञ सुरु ठेवला होता.त्यांनी अखेरपर्यंत कीर्तनाचे रंगी रंगण्याचे व्रत सुरु ठेवले व शेवटच्या श्वासापर्यंत पाळले आहे.व आपला शब्द खरा करून दाखवला असल्याचे सिद्ध झाले आहे.कीर्तनासाठी त्यांनी सौदेबाजी कधीही केली नाही.कन्नड पर्यंत आपल्या दुचाकीवर कधी कीर्तनाला गेले असतील तर त्यांना मिळालेले १५१ रुपयेही त्यांनी समाधान पावून घेतल्याचे अनेक दाखले पदोपदी आढळतील.त्यांचे बँक खातेही नव्हते हे विशेष ! अत्यंत निस्वार्थी सेवा करून आपला शेवटचा श्वास घेतला आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांचे पट्ट शिष्य म्हणून ओळखले जाणारे व १९८० पासून तब्बल चाळीस वर्ष त्याचा सहवास लाभलेले ह.भ.प.भानुदास महाराज बोलकीकर यांचेशी आमच्या प्रतिनिधीने संपर्क साधला असता त्यांनी हा कीर्तन परंपरेतील महान संत असल्याचे स्पष्ट केले असून जोग महाराज व प्राचार्य मामासाहेब दांडेकर या संताच्या महान परंपरेतील अखेरचा दुवा असल्याचे गौरवाने सांगितले असून ते विशेषण सार्थ असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.