निधन वार्ता
अनिल थोरात यांचे अकस्मात निधन
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील जवळके ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच व कापड व्यावसायिक दत्तात्रय काशिनाथ थोरात यांचे सुपुत्र अनिल थोरात (वय-३०) आज पहाटे दोन वाजता अकस्मात निधन झाले आहे.त्यांच्या पच्छात पत्नी,आई,वडील,दोन बहिणी असा परिवार आहे.त्यांच्यावर जवळके या ठिकाणी दुपारी दोन वाजेच्या सुमारास शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.
स्व.अनिल थोरात हे रात्री दोन वाजता लघुशंका करून येतो असे पत्नीला सांगून घराबाहेर पडले असता बराच वेळ होऊनही ते परत न आल्याने त्यांची जवळच्या नातेवाईकांनी शोधाशोध सुरु केली असता ते पहाटे चार वाजेच्या सुमारास गावातील सार्वजनिक आडानजीक त्यांचे पादत्राणे दिसून आल्याने त्यांचा शोध लागला ग्रामस्थांनी त्यांना काढले तोपर्यंत खूप उशीर झाला होता.त्यांना आधी शिर्डी येथील श्री साईबाबा सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले आहे.त्यांचे शव विच्छेदन केल्यानंतर जवळके येथे त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले त्यावेळी ग्रामस्थ सुरक्षित अंतर राखून उपस्थित होते.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.