जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निधन वार्ता

काशिनाथ बाभळे यांचे निधन

न्यूजसेवा

संवत्सर-(प्रतिनिधी)

  संवत्सर येथील लक्ष्मणवाडी परिसरातील रहिवासी धार्मिक व सामाजिक क्षेत्रातील ज्येष्ठ कार्यकर्ते काशिनाथ तुकाराम बाभळे यांचे रविवार दि.५ एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास वृध्दापकाळाने निधन झाले आहे.मृत्यू समयी ते ८२ वर्षाचे होते.त्यांच्या पश्चात पत्नी,पत्नी दोन मुले,दोन मुली असा परिवार आहे.त्यांच्यावर दुपारी संवत्सर येथे गोदावरी काठावर अंत्यसंस्कार करण्यात आलेत.ग्रामस्थ व नातेवाईक मोठ्या संख्येने अंत्यविधीसाठी उपस्थित होते.

स्व.काशिनाथ तुकाराम बाभळे.

  

  कै.काशिनाथ बाभळे यांचा सामाजिक कार्याबरोबरच धार्मिक कार्यक्रात मोलाचा सहभाग होता.त्यांचे वडील तुकाराम बाभळे हे अनेक वर्षापूर्वी लक्ष्मणवाडी परिसरात वास्तव्यास आलेले होते.त्यांचाही धार्मिक कार्यात मोठा सहभाग आणि संपर्क होता. वडीलांच्या मार्गदर्शनाखाली कै.काशिनाथ बाभळे यांनी धार्मिक कार्याला वाहून घेतले होते.

  स्व.नामदेवराव परजणे यांनी वडीलांच्या मार्गदर्शनाखाली कै.काशिनाथ बाभळे यांनी धार्मिक कार्याला वाहून घेतले होते.श्री क्षेत्र पंढरपूर,त्र्यंबकेश्वर,पैठण अशा विविध तीर्थक्षेत्राच्या पायी दिंड्यांमध्ये ते नेहमी सहभागी होत असत.लक्ष्मणवाडी परिसरातील श्री मारुती मंदिरासह इतर मंदिरामध्ये दररोज दर्शनासाठी जाणे,दिवाबत्ती करणे हा त्यांचा नित्यनियम होता.दुग्ध व्यवसायात त्यांनी चांगली प्रगती केलेली होती.या व्यवसायाचा त्यांना चांगला अनुभव होता.प्रामाणिक,निस्वार्थी व मनमिळावू स्वभावामुळे पंचक्रोशीत व तालुक्यात ते सर्वांच्या परिचित होते.

  वयोमानामुळे गेल्या काही दिवसांपासून काशिनाथ बाभळे यांच्यावर एस.जी.एम.रुग्णालयात उपचार सुरु होते.उपचार सुरु असतानाच अखेर आज रविवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.संवत्सर येथील गोदावरी काठावर दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.गोदावरी खोरे दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे,पंचायत समितीचे माजी सदस्य कृष्णा परजणे,सरपंच सुलोचना ढेपले,उपसरपंच विवेक परजणे,लक्ष्मण साबळे,दिलीप ढेपले,महेश परजणे आदींनी यांनी कै.काशिनाथ बाभळे यांच्या निधनाबद्द‌ल शोक व्यक्त केला.अंत्यविधीसाठी ग्रामस्थ,नातेवाईक यांच्यासह विविध क्षेत्रातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close