निधन वार्ता
मंजुळाबाई भाकरे यांचे निधन

न्यूजसेवा
संवत्सर-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथील लक्ष्मणवाडी परिसरातील रहिवासी मंजुळाबाई भगवंतराव भाकरे यांचे सोमवार आज सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास वृध्दापकाळाने निधन झाले आहे.मृत्यू समयी त्या ८५ वर्षाच्या होत्या.त्यांच्यावर दुपारी संवत्सर येथे गोदावरी काठावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.ग्रामस्थ व नातेवाईक मोठ्या संख्येने अंत्यविधीसाठी उपस्थित होते.

स्व.नामदेवराव परजणे यांचे विश्वासू सहकारी स्व.भगवंतराव भाकरे यांच्या त्या धर्मपत्नी होत्या.त्या धार्मिक व मनमिळावू स्वभावामुळे पंचक्रोशीत त्या सर्वांच्या परिचित होत्या.त्यांच्या पश्चात दगुराव भाकरे,रविंद्र भाकरे व शरद भाकरे ही तीन मुले,दोन मुली,सुना,नातवंडे असा परिवार आहे.गोदावरी खोरे दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे,पंचायत समितीचे माजी सदस्य कृष्णराव परजणे,संवत्सर ग्रामपंचायतच्या सरपंच सुलोचना ढेपले यांनी कै.मंजुळाबाई यांच्या निधनाबदल शोक व्यक्त केला आहे.अंत्यविधीप्रसंगी अनेकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.यावेळी विविध स्तरातील मान्यवर तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



