जाहिरात-9423439946
निधन वार्ता

चांगदेव डुबे यांचे निधन

न्यूजसेवा

संवत्सर-(वार्ताहर)

  कोपरगांव येथील अंबिकानगर भागातील रहिवासी व गोदावरी खोरे सहकारी दूध संघाचे सेवानिवृत्त टेलिफोन ऑपरेटर चांगदेव गणपतराव डुबे यांचे मंगळवार दि.३ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी निधन झाले आहे.मृत्यूसमयी ते ७२ वर्षांचे होते.कोपरगांव येथील अमरधामध्ये सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.मोठा जनसमुदाय यावेळी उपस्थित होता.

   कै.चांगदेव डुबे यांचे वडील गणपतराव संपतराव डुबे हे शेती महामंडळाच्या संवत्सर मळ्यात सेवेत होते.संवत्सर येथील लक्ष्मणवाडी परिसरात त्यांचे अनेक वर्षे वास्तव्य असल्याने कै.चांगदेव डुबे यांचे बालपण देखील लक्ष्मणवाडी येथे गेले होते. 

   कै.चांगदेव डुबे यांचे वडील गणपतराव संपतराव डुबे हे शेती महामंडळाच्या संवत्सर मळ्यात सेवेत होते.संवत्सर येथील लक्ष्मणवाडी परिसरात त्यांचे अनेक वर्षे वास्तव्य असल्याने कै.चांगदेव डुबे यांचे बालपण देखील लक्ष्मणवाडी येथे गेले.संवत्सर येतील जनता हायस्कूल व इतर शाळेमध्ये त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले.त्यानंतर गोदावरी दूध संघामध्ये त्यांनी टेलिफोन ऑपरेटर म्हणून अनेक वर्षे नोकरी केली.त्यांच्यामागे पत्नी,दोन मुले,भाऊ असा परिवार आहे.

    कोपरगांव येथे मंगळवारी सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.अनेक ग्रामस्थ याप्रसंगी उपस्थित होते.गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे,पंचायत समितीचे माजी सदस्य कृष्णराव परजणे,उपसरपंच विवेक परजणे,सरपंच सुलोचना ढेपले यांनी कै.डुबे यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करुन त्यांना श्रध्दांजली वाहिली व डुबे परिवाराचे सांत्वन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close