जाहिरात-9423439946
निधन वार्ता

स्व.पवार यांचे शहर विकासाला मोठे योगदान-…या नेत्याचे प्रतिपादन

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

  माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सहकाराची मोठी जाणीव होती.त्यांनी सहकाराला मोठे योगदान दिले होते शिवाय कोपरगाव तालुक्यातील तहसील,पोलिस ठाणे,ग्रामीण रुग्णालये आदी इमारतींची विविध विकासकामे यांच्या कामाची साक्ष असल्याचे प्रतिपादन कोपरगावचे माजी आ.अशोक काळे यांनी आज कोपरगाव येथील एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

माजी आ. अशोक काळे बोलताना क्षण.

“सहकारी कारखानदारीच्या व्ही.एस.आय.च्या मिटिंगमध्ये आपल्याला स्व.अजित दादांनी बऱ्याच वेळा बोलण्याची संधी दिली होती.अनेक ज्येष्ठ नेते त्यात असताना आपल्याला संधी दिली असल्याचे आठवण करून दिली आहे.नवीन तंत्रज्ञान शिकण्याचे प्रोत्साहन देत असत.आपण ब्राझीलला गेलो असता आपण मीटिंगला केवळ एक मिनिट उशीर झाल्यावर त्यांनी आपल्या झापले होते ते वेळचे पक्के होते”-विवेक कोल्हे,अध्यक्ष,सहकार महर्षी कोल्हे कारखाना.

   राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं चार दिवसापूर्वी विमान अपघातात निधन झालं आहे.अजित पवार प्रचारासाठी आणि सभांसाठी बारामती या ठिकाणी चालले होते.त्यावेळी अजित पवारांचं विमान हे धावपट्टीवर उतरत असताना त्याचा स्फोट झाला आणि अजित पवार नावाचा लोकनेता या अपघातात काळाच्या पडद्याआड गेला.अजित पवार विमानाने मुंबईहून बारामतीमध्ये आले होते.मात्र विमानाचे लँडिंग होत असताना हा अपघात झाल्याची माहिती समोर आली होती.यात अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.त्याची तीव्र प्रतिक्रिया राज्यात उमटली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.त्यांचे निमित्ताने कोपरगाव शहरात सर्वपक्षीय शोकसभेचे कलश मंगल कार्यालयात आज दुपारी 4.30 वाजता आयोजन केले होते.त्यावेळी ते बोलत होते.

विवेक कोल्हे बोलतानाचा क्षण.

   त्यावेळी सहकार महर्षी कोल्हे साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे,जिल्हा बँकेच्या संचालिका चैताली काळे,प्रियदर्शनी महिला मंडळाच्या अध्यक्षा पुष्पलता काळे,कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष पराग संधान,उपाध्यक्ष जितेंद्र रणशूर,उद्योजक कैलास ठोळे,गोदावरी परजणे दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे,महानंदाचे माजी अध्यक्ष राजेंद्र जाधव,माजी नगराध्यक्ष कुदळे,कर्मवीर काळे कारखान्याचे उपाध्यक्ष प्रवीण शिंदे,माजी उपाध्यक्ष कारभारी आगवण,दीपक साळुंखे,माजी गटनेते वीरेन बोरावके,शिंदे सेनेच्या जिल्हाप्रमुख विमल पुंडे आदीसह बहुसंख्य मान्यवर उपस्थित होते.

माजी उपमुख्यमंत्री स्व.अजित पवार यांचे श्रद्धांजली सभेस उपस्थित मान्यवर दिसत आहे.

   त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”स्व.अजित दादांचे जाणे पवार कुटुंबांचे नुकसान नाही,पक्षाच्या कार्यकर्त्यांना नव्हें तर सर्व समाजाचे नुकसान करणारे व मनाला चटका लावणारे आहे.त्यांना सहकाराची चांगली जाण होती.त्यांनी कोपरगाव शहराच्या विकासाला मोठी मदत केली होती.त्यामुळेच कोपरगाव तहसील,पंचायत समिती,पोलिस ठाण्याच्या इमारती,पोलिस वसाहती इमारती,कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाच्या इमारती उभ्या राहिल्या आहेत.त्यांच्या जाण्याने कोपरगाव तालुक्याचे मोठे नुकसान झाले आहे.ते कधीही भरून निघणार नाही हे उघड आहे.त्यांचे आणि आ.आशुतोष काळे यांचा मोठा संपर्क होता.त्यांची सायंकाळी मंत्रालयात भेट ठरलेली होती.मात्र सकाळी त्यांना फोन आला आणि सर्व होत्याचे नव्हते झाले आहे.त्यांनी मला उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधनाची बातमी फोन करून सदर बातमी सांगितली होती.त्याला काय बोलावे हे समजत नव्हते.त्यांचा कंठ दाटून आला होता.त्यांनी लगेच मुंबईवरून बारामती कडे धाव घेतली आजही ते पवार कुटुंबाजवळ बारामतीत आहे.त्यामुळं आजच्या शोकसभेला थांबू शकले नसल्याचा खुलासा केला आहे.जो माणूस जन्माला येतो त्याला मृत्यू ठरलेला असतो.मात्र तो माणूस त्यांच्या कार्याने ओळखला जातो.राजकारण त्याच्या पद्धतीने होत असते,मात्र या माणसाचे नाव जनसामान्य माणसाच्या हृदयात कोरले गेले आहे.आ.आशुतोष काळे यांनी सन-2024 साली आपला वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांनी अजित पवार यांना येण्याची विनंती केली होती.त्यांनी क्षणाचा विलंब न करता होकार दिला मात्र त्यावेळी यांनी वेळेचे बंधन घातल्याची आठवण करून दिली.वेळचा पक्का असलेला हा नेता आपल्यात नाही यावर खरे तर विश्वास बसत नाही.त्यांनी आपल्याला भाऊ मानून आ.आशुतोष काळे यांना पुत्रवत प्रेम दिले असल्याचे सांगून त्यांनी एकाएकी जाणे ही घटना खरे तर खूपच वेदनादायी असल्याचे सांगून त्यांना शेवटी यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

  यावेळी विवेक कोल्हे हे बोलताना म्हणाले की,”आपल्याला अजित पवार यांनी युवकांना प्रोत्साहन देण्याचे काम केले होते.आपल्याला त्यांनी पहिल्या भेटीत त्यांचा अभ्यास अनुभवाला आला होता.त्यावेळी आपल्याला वेळ देऊन कार्यक्रम रद्द केला होता.मात्र आपण तिकीट रद्द करून थांबलो असल्याचे सांगितल्यावर त्यांनी अडीच तास वेळ दिला होता.व्ही.एस.आय.च्या मिटिंगमध्ये आपल्याला बऱ्याच वेळा बोलण्याची संधी दिली होती.अनेक ज्येष्ठ नेते त्यात असताना आपल्याला संधी दिली असल्याचे आठवण करून दिली आहे.नवीन तंत्रज्ञान शिकण्याचे प्रोत्साहन देत असत.आपण ब्राझीलला गेलो असता आपण मीटिंगला केवळ एक मिनिट उशीर झाल्यावर त्यांनी आपल्या झापले असल्याची आठवण करून दिली आहे.त्यानंतर त्यांनी अनेक वेळा माजी मंत्री स्व.कोल्हे यांच्या कामाच्या शैलीच्या आठवणी करून दिल्या होत्या.ते आपले लाडके नेते असल्याचे सांगून त्यांनी रानवड सहकारी साखर कारखाना चालविण्यास घेतला असल्याचे सांगून त्यांना त्याची मुदत वाढवून मागितली तर त्यांनी लगेच वाढवून दिली होती अशी आठवण करून दिली होती.ते जाण्याच्या आदल्या दिवशी त्यांनी नाशिकच्या आ.सरोज आहेर यांच्या एक कोटी रुपयांच्या स्मशान भूमीच्या कामावर सही केली असल्याचे आठवण करून दिली व दुसऱ्या दिवशी अशी दुर्दैवी घटना घडली असल्याचे सांगितले व “असेन मी,नसेन मी,पण माझ्या कार्यातून दिसेन मी” अशी शेवटी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

   सदर प्रसंगी राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे,राजेश परजणे,नगराध्यक्ष पराग संधान,चैताली काळे,कैलास ठोळे,प्रमोद लभडे,दीपक साळुंखे,भरत मोरे,प्रशांत वाबळे,नसीर सय्यद आदींनी श्रद्धांजली वाहिली आहे तर यावेळी शिवाजी ठाकरे यांनी सूत्रसंचलन केले तर समारोप पसायदानाने केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close