निधन वार्ता
सविता खुळे यांचे निधन

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
नाशिक जिल्ह्यातील जेलरोड,दसक येथील रहिवासी व साईलीला व अन्नपूर्णा हॉटेलचे संचालक भाऊसाहेब खुळे यांच्या धर्मपत्नी सविता भाऊसाहेब खुळे (वय-५७ वर्षे) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात पती,दोन मुले,एक मुलगी,नातवंडे असा परिवार आहे.

स्व.सविता खुळे या अत्यंत धार्मिक व मनमिळावू स्वभावाच्या म्हणून नाशिक जेलरोड,दसक आणि परिसरात परिचित होत्या.त्यांच्यावर आज सकाळी १०.३० वाजता शोकाकुल वातावरणात गोदावरी तीरी येथील दसक येथील अमरधाम येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.स्व.सविता खुळे या संवत्सर येथील एस.एल.परजणे,बापूसाहेब परजणे यांच्या त्या मावस भावजय तर पत्रकार शिवाजी गायकवाड यांच्या त्या मावस भगिनी होत्या.
त्यांच्या अंत्यविधी समयी नाशिक महानगर पालिकेचे नगरसेवक मंगला आढाव,पूजा नवले,व्यापारी बँकेचे संचालक दत्ता गायकवाड आदीसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.


