निधन वार्ता
शंकर दरेकर यांचे निधन

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील धोंडेवाडी येथील प्रगतशील शेतकरी व ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच शंकर राजाराम दरेकर (वय-82) यांचे वृद्धापकाळाने काल सकाळी 08 वाजता निधन झाले आहे.त्यांचेवर धोंडेवाडी येथे दुपारी 1.30 वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.त्यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.

स्व.शंकर दरेकर हे अत्यंत मनमिळावू व विनोदी स्वभावाचे म्हणून जवळके,धोंडेवाडी आणि परिसरात परिचित होते.ते माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचे निष्ठावान सहकारी होते.त्यांच्या पश्चात चार मुले,मुली,नातवंडे असा परिवार आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.विठ्ठल दरेकर यांचे ते पिताश्री होते.



