निधन वार्ता
दिनकर वरगुडे यांचे निधन

न्यूजसेवा
संवत्सर -(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथील प्रगतशील शेतकरी दिनकर जगन्नाथ वरगुडे (वय -५५) यांचे नुकतेच निधन झाले आहे.त्यांचेवर संवत्सर येथील गोदातीरी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.

स्व.दिनकर वरगुडे हे अत्यंत मनमिळावू स्वभावाचे म्हणून संवत्सर आणि परिसरात परिचित होते.ते काही दिवसापूर्वी उपचारार्थ शिर्डी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
स्व.दिनकर वरगुडे हे अत्यंत मनमिळावू स्वभावाचे म्हणून संवत्सर आणि परिसरात परिचित होते.ते काही दिवसापूर्वी उपचारार्थ शिर्डी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.मात्र त्यांना वाचविण्यात वैद्यकीय अधिकारी अपयश ठरले आहे.त्यांच्यावर संवत्सर येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.त्यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.
त्यांच्या पश्चात पत्नी,दोन भाऊ,एक मुलगा,दोन मुली नातवंडे असा परिवार आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.त्यांच्या निधनाबद्दल गोदावरी नामदेवराव परजणे दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे,सरपंच सुलोचना ढेपले, उपसरपंच विवेक परजणे आदींनी दुःख व्यक्त केले आहे.