निधन वार्ता
जिनिंगचे माजी अध्यक्ष शिंदे यांचे निधन

न्युजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
कोपरगाव तालुका जिनिंग प्रेसिंग सोसायटीचे माजी अध्यक्ष व महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्टचे माजी सचिव पोहेगाव येथील प्रगतशील शेतकरी निवृत्ती शिंदे (वय-७३) यांचे आज पहाटे ०५ वाजेच्या सुमारास शिर्डी येथील श्री साईबाबा रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात पत्नी,दोन भाऊ,दोन बहिणी,दोन मुले,एक मुलगी असा मोठा परिवार आहे.ते माजी पंचायत समिती सदस्या उज्वला शिंदे यांचे पती होते.

स्व.निवृत्ती शिंदे हे जुन्या पिढीतील एम.एससी.हे कृषी क्षेत्रातील पदव्युत्तर शिक्षण घेतलेले पोहेगाव येथील विद्यार्थी होते.ते माजी खा.स्व.शंकरराव काळे यांचे निष्ठावान सहकारी होते.त्यांना सहकारातील अनेक वरिष्ठ पदे देऊनही त्यांनी ती नाकारली होती.त्यामुळे ते माजी खा.काळे यांच्या आदराला पात्र होते.सहकारी कारखान्याच्या विविध अभ्यास दौऱ्यात त्यांचा एक कृषि कृषितज्ज्ञ म्हणून हिरीरीने सहभाग असायचा.
स्व.निवृत्ती शिंदे हे जुन्या पिढीतील एम.एससी.हे कृषी क्षेत्रातील पदव्युत्तर शिक्षण घेतलेले पोहेगाव येथील विद्यार्थी होते.ते माजी खा.स्व.शंकरराव काळे यांचे निष्ठावान सहकारी होते.त्यांना सहकारातील अनेक वरिष्ठ पदे देऊनही त्यांनी ती नाकारली होती.त्यामुळे ते माजी खा.काळे यांच्या आदराला पात्र होते.सहकारी कारखान्याच्या विविध अभ्यास दौऱ्यात त्यांचा एक कृषि कृषितज्ज्ञ म्हणून हिरीरीने सहभाग असायचा.त्याच्या निधनाने एक कृषितज्ज्ञ तालुक्याने गमावला असल्याची प्रतिक्रिया जिल्ह्यातील व तालुक्यातील सहकार क्षेत्रात व्यक्त होत आहे.त्यांच्यावर पोहेगाव येथील स्मशान भूमीत आज सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे.राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते संदीप वर्पे याचे ते काकाश्री होते.
दरम्यान त्यांच्या निधनाबद्दल माजी आ.अशोक काळे, आ.आशुतोष काळे,कर्मवीर काळे सहकारी कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक सुनील कोल्हे,माजी उपाध्यक्ष सचिन रोहमारे,राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश प्रवक्ते संदीप वर्पे,पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुन काळे,बाजार समितीचे माजी सभापती मधुकर टेके,माजी उपसभापती राजेंद्र निकोले आदींनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.