निधन वार्ता
शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे निधन !

न्युजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव नगरपरिषदेच्या नगरसेविका सिंधुबाई शिंगाडे यांचा मुलगा व कोपरगाव शहर शिवसेना (उबाठा)गटाचे उपशहर प्रमुख प्रफुल्ल शिंगाडे यांचे नुकतेच हृदय विकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात पत्नी,आई,वडील,एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

स्व.प्रफुल्ल शिंगाडे हे आपल्या घरी असताना त्यांना हृदय विकाराचा तीव्र झटका आला होता.त्यांना त्यांच्या वडिलांनी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ भरती केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केलं आहे.
स्व.प्रफुल्ल शिंगाडे हे आपल्या घरी असताना त्यांना हृदय विकाराचा तीव्र झटका आला होता.त्यांना त्यांच्या वडिलांनी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ भरती केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केलं आहे.त्याबाबत शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
स्व.प्रफुल्ल शिंगाडे हे शिवसेनेचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून ओळखले जात असत.त्यांच्या निधनाने कोपरगाव नगरपरिषदेचे माजी अध्यक्ष विजय वहाडणे,शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे,जिल्हा समन्वयक कलविंदर दडीयाल,माजी तालुका प्रमुख शिवाजी ठाकरे,शहर प्रमुख सनी वाघ,विधानसभा प्रमुख किरण खर्डे,कोपरगाव पश्चिम तालुका प्रमुख गंगाधर रहाणे,पूर्व विभाग प्रमुख संजय दंडवते आदींनी दुःख व्यक्त केले आहे.त्यांचेवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करणेत आले आहे.