निधन वार्ता
ऍड.खालकर यांना बंधूशोक

न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव वकील संघाचे माजी अध्यक्ष ऍड.साहेबराव विठ्ठल खालकर यांचे ज्येष्ठ बंधू रामनाथ विठ्ठल खालकर (वय-७४) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने रांजणगाव देशमुख येथे खालकर वस्तीवर निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात पत्नी,तीन भाऊ,दोन मुले,सूना नातवंडे असा मोठा परिवार आहे.

स्व.रामनाथ खालकर हे अत्यंत कष्टाळू आणि मनमिळावू स्वभावाचे म्हणून रांजणगाव देशमुख आणि परिसरात परिचित होते.ते प्रगतिशील शेतकरी म्हणूनही परिसरात परिचित होते.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.ते मराठा महासंघाचे कार्यकर्ते ऍड.योगेश खालकर यांचे चुलते होते.त्यांच्या निधनाबद्दल निळवंडे कालवा कृती समितीचे संस्थापक नानासाहेब जवरे,अध्यक्ष रूपेंद्र काले,शिवसेनेचे तालुका प्रमुख गंगाधर रहाणे,समितीचे संघटक नानासाहेब गाढवे,सचिव कैलास गव्हाणे,विलास गुळवे,सौरभ शेळके,रमेश दिघे,मच्छिंद्र दिघे,बाबासाहेब गव्हाणे,आप्पासाहेब कोल्हे आदींनी दुःख व्यक्त केले आहे.