निधन वार्ता
ज्ञानदेव जुधारे यांचे निधन

न्युजसेवा
माहेगाव देशमुख-(प्रतिनिधी)
सिन्नर तालुक्यातील कोळगाव माळ येथील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सेवानिवृत्त अभियंता ज्ञानदेव रामचंद्र जुंधारे (वय -६०)यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

स्व.ज्ञानदेव जूंधारे हे अत्यंत मनमिळावू स्वभावाचे म्हणून कोळगाव माळ आणि परिसरात परिचित होते.त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा,दोन मुली,चार भाऊ,चार बहिणी,सुना,नातवंडे असा मोठा परिवार आहे.ते पांडुरंग जुंधारे आणि डॉ.सोपान जुंधारे,तुकाराम जुंधारे यांचे ते भाऊ होते.