निधन वार्ता
चांगदेव निरगुडे यांचे निधन
न्युजसेवा
संवत्सर -(प्रतिनिधी)
कोपरगांव तालुक्यातील संवत्सर प्रगतशील शेतकरी चांगदेव गोधाजी पा.निरगुडे यांचे मंगळवारी दि. १२ नोव्हेंबर रोजी अल्पशा आजाराने निधन झाले आहे.मृत्यूसमयी ते ६५ वर्षाचे होते.संवत्सर येथील गोदावरी काठावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी परिसरातून मोठा जनसमुदाय उपस्थित होता.
कै.चांगदेव निरगुडे हे तात्या नांवाने परिसरात परिचित होते.प्रगतशील शेतकरी म्हणून त्यांचा लौकीक होता.मित्र परिवारात चांगदेव महाराज म्हणूनही ते परिचित होते. मनमिळावू व धार्मिक स्वभावामुळे त्यांनी समाजात आदराचे स्थान मिळविले होते.
त्यांच्यामागे पत्नी,तीन मुली तसेच रामचंद्र,लक्ष्मण,मारुती हे तीन बंधू असून शिवाजीराव निरगुडे हे बंधू मयत झालेले आहेत.
संवत्सर येथे गोदावरी काठावर त्याच्यावर अत्यसंस्कार करण्यात आलेत.यावेळी परिसरातील ग्रामस्थ,नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.अनेकांनी कै.निरगुडे पाटील यांना आदरांजली वाहिली.जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांनी निरगुडे कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.कै.चांगदेव निरगुडे यांच्या निधनामुळे संवत्सर परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.