जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निधन वार्ता

अण्णासाहेब थोरात यांना पितृशोक

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

   कोपरगाव तालुक्यातील जवळके येथील प्रगतशील शेतकरी व कार्यकर्ते अण्णासाहेब थोरात यांचे पिताश्री सखाहरी बाळाजी थोरात (वय -८७) यांचे नुकतेच राहत्या घरी वृद्धाप काळामुळे निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात पत्नी,दोन भाऊ,दोन मुले,चार मुली असा परिवार आहे.

   स्व.सखाहारी थोरात हे अत्यंत मनमिळावू व कष्टाळू स्वभावाचे म्हणून जवळके आणि परिसरात परिचित होते.त्यांनी आपल्या मुलांना मोठ्या कष्टातून शिक्षित केले होते.ते संगमनेर येथील डॉ.कुटे हॉस्पिटलचे व्यवस्थापक अण्णासाहेब थोरात यांचे पिताश्री होते.त्यांच्यावर जवळके येथील स्मशान भूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.त्यावेळी मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.


   त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.त्यांच्या निधनाबद्दल निळवंडे कालवा कृती समितीचे संस्थापक नानासाहेब जवरे,माजी उपअभियंता एस.के.थोरात,माजी सरपंच वसंत थोरात,माजी उपसरपंच डी.के.थोरात,विजय थोरात,बाळासाहेब थोरात,दत्तात्रय थोरात,नवनाथ पन्हाळे,अण्णासाहेब भोसले,नवनाथ शिंदे आदींनी दुःख व्यक्त केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close