निधन वार्ता
कूडके गुरुजी यांचे निधन
न्यूजसेवा
कोपरगाव – (प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील बहादरपुर येथील निवासी असलेले सेवानिवृत्त शिक्षक शंकर भिमाजी कुडके (वय -87) यांचे आज पहाटे 04 वाजता निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात दोन मुले,दोन मुली असा परिवार आहे.त्यांचेवर बहादरपुर येथील स्मशानभूमीत आज सायंकाळी 5.30 वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.
स्व.कुडके गुरुजी यांनी बहादरपुर आणि परिसरातील अनेक पिढ्या घडविल्या होत्या.ते कड्क शिस्तीचे शिक्षक म्हणून ओळखले जात होते.त्यांच्या बद्दल बहादरपुर आणि परिसरात अत्यंत आदर होता.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.