निधन वार्ता
कु.अंजली देशमुख हिचे निधन

न्यूजसेवा
संवत्सर (वार्ताहर)
गोदावरी खोरे सहकारी दूध संघातील कर्मचारी व संवत्सर येथील रहिवासी राजेंद्र देशमुख यांची कन्या कु.अंजली देशमुख हिचे नुकतेच निधन झाले.मृत्यूसमयी ती अवघ्या २१ वर्षाची होती.संवत्सर येथील गोदावरी काठावर तिच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी परिसरातून मोठा जनसमुदाय उपस्थित होता.

कु.अंजली ही पसिरात सर्वांच्या परिचित होती. मनमिळाऊ स्वभावाने तिने सर्वांचीच मने जिंकली होती.तिच्या अशा अकाली निधनाबद्ल अनेकांनी शोक व्यक्त करुन अंत्यविधीच्यावेळी भावपूर्ण श्रध्दांजली वाहिली. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.