निधन वार्ता
माजी सरपंच तिरमखे यांचे निधन
न्यूजसेवा
संवत्सर-(प्रतिनिधी)
कोपरगांव तालुक्यातील संवत्सर ग्रामपंवायतीच्या माजी सरपंच मंगलाताई आण्णासाहेब तिरमखे यांचे मंगळवारी रात्री ११.४० वाजता निधन झाले. मृत्युसमयी त्या ७० वर्षाच्या होत्या.संवत्सर येथे गोदावरी काठावर त्यांच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.पंचक्रोशीतून मोठा जनसमुदाय यावेळी उपस्थित होता.
संवत्सर येथील रहिवासी व सार्वजनिक बांधकाम उप विभागाचे उप अभियंता आण्णासाहेब तिरमखे यांच्या मंगलाताई या पत्नी तर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या लग्न कत्लोळ चित्रपटाचे निर्माते स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ.मयूर मिरमखे,डॉ.संतोष तिरमखे व आर्किटेक्ट अमित तिरमखे यांच्या त्या मातोश्री होत्या.दिवंगत नेते नामदेवराव परजणे यांच्या काळात मंगलाताई या सलग पाच वर्षे संवत्सर गांवच्या सरपंच होत्या त्यांच्या काळात ग्रामविकासाच्या विविध योजना जिल्हा परिषदेचे सदस्य राजेश परजणे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी राबविल्या.तसेच पंचायत समितीचे माजी सदस्य कृष्णराव परजणे पाटील यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समितीच्या अनेक योजनाही त्यांनी गांवपातळीवर राबविल्या होत्या.मनमिळावू स्वभावाने त्या परिसरात सर्वांच्याच परिचित होत्या.त्यांच्या पश्चात सुना,नातवंडे,दीर, जावा असा मोठा परिवार आहे.
त्यांच्या निधनाबद्दल संवत्सर ग्रामपंचायतीचे उपसरपंच विवेक परजणे,ज्येष्ठ कार्यकर्ते लक्ष्मणराव साबळे,सहकार महर्षि शंकरराव कोल्हे साखर कारखान्याचे संचालक ज्ञानेश्वर परजणे,संचालक बापूसाहेब बारहाते,कर्मवीर शंकरराव काळे साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष दिलीप बोरनारे यांच्यासह अनेकांनी त्यांना श्रध्दांजली वाहिली मंगलाताई यांच्या निधनावद्दल जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे,गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे,सरपंच सुलोचना ढेपले,गामविकास अधिकारी कृष्णकांत आहिरे आदींनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
सदर अंत्यविधीसाठी संवत्सरसह पंचक्रोशीतून व विविध जिल्ह्यातून वेगवेगळ्या क्षेत्रातील मोठा जनसमुदाय उपस्थित होता.