निधन वार्ता
भिकनराव लाड यांचे निधन
न्यूजसेवा
संवत्सर (वार्ताहर)
कोपरगांव तालुक्यातील संवत्सर (लक्ष्मणवाडी) येथील राजकीय,सामाजिक,धार्मिक क्षेत्रातील ज्येष्ठ कार्यकर्त भिकनराव परशुराम लाड यांचे नुकतेच वयाच्या ७३ व्या वर्षी निधन झाले.संवत्सर येथे गोदावरी काठावर त्यांच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.पंचक्रोशीतून मोठा जनसमुदाय यावेळी उपस्थित होता.
ते नवनाथ ग्रंथाचे दरवर्षी वाचन व पारायण करण्याचा त्यांचा नित्यनियम होता,महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या मळ्यात अनेक वर्षे त्यांनी काम केलेले होते.सेवानिवृत्तीनंतर त्यांनी शेतीबरोबर दुग्ध व्यवसायात चांगला जम बसविला होता,सर्वसामान्य लोकांच्या सुख-दुःखात ते नेहमी अग्रभागी असत.मनमिळावून स्वभाव व धार्मिक,सामाजिक कार्याची तळमळ यामुळे कै.लाड हे पंचक्रोशीत लहान थोरांच्या परिचित होते.त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले,एक मुलगी,सुना,नातवंडे असा परिवार आहे.लक्ष्मणवाडी येथील युवक कार्यकर्ते रविंद्र व सुभाष लाड यांचे ते वडील होते.त्यांच्या निधनाबद्दल महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाचे अध्यक्ष राजेश परजणे,कोपरगांव पंचायत समितीचे माजी सदस्य कृष्णराव परजणे,संवत्सर ग्रामपंचायतीचे उपसरपंच विवेक परजणे,ज्येष्ठ कायकर्ते लक्ष्मणराव साबळे यांच्यासह अनेकानी कै.भिकनराव लाड यांना श्रध्दांजली वाहिली.याप्रसंगी संवत्सरसह पंचक्रोशीतून मोठा जनसमुदाय उपस्थित होता.