निधन वार्ता
एल.डी.पानगव्हाणे यांचे निधन

न्यूजसेवा
माहेगाव देशमुख-(वार्ताहर)
कोपरगाव शहरातील संजीवनी सहकारी पतसंस्थेचे माजी उपाध्यक्ष व माहेगाव देशमुख येथील प्रगतशील शेतकरी लक्ष्मणराव किसनराव पानगव्हाणे (वय-७६)यांचे नुकतेच हृदविकाराच्या धक्क्याने निधन झाले आहे.त्यांचा पश्चात पत्नी,दोन मुले,तीन मुली,सूना,नातवंडे असा परिवार आहे.ते माजी मंत्री शंकरराव कोल्हे त्यांचे हे विश्वासू सहकारी मानले जात होते.

स्व.एल.डी.पानगव्हाणे यांचा माहेगाव देशमुख येथील कुठल्याही सार्वजनिक कामामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा असायचा.त्यात मग गावाची यात्रा असो किवा हरींनाम सप्ताह असो.स्व.पानगव्हाणे हे अमृतेश्वर मंदिराचे विश्वस्त,दत्त मंदिराचे सेवेकरी,माहेगाव देशमुख ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आदी पदे त्यानी भूषवली होती.

संजीवनी कारखान्याचे कर्मचारी प्रवीण व अमोल पानगव्हाणे यांचे ते वडील होते.त्यांच्या अंत्यविधी समयी संजीवनी सहकारी कारखान्याचे माजी अध्यक्ष बिपीन कोल्हे,माजी पोलीस अधीक्षक के.पी.रोकडे,कर्मवीर काळे सहकारी कारखान्याचे माजी संचालक अरुण चंद्रे,पंचायत समितीचे माजी सभापती अर्जुन काळे,पत्रकार माणिक उगले आदीसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपास्थित होते.