निधन वार्ता
कौशल्याबाई तिरसे यांचें निधन

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव नगरपरिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष व वसुली विभागातील अधिकारी संजय तिरसे यांच्या मातोश्री कौशल्याबाई कारभारी तिरसे (वय-९३) यांचे नुकतेच वृद्धापकाळामुळे निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात चार मुले,तीन मुली,सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे.

स्व.कौशल्याबाई तिरसे या अत्यंत धार्मिक व मनमिळाऊ स्वभावाच्या म्हणून परिचित होत्या.त्यांचे पती कारभारी तिरसे यांचे दि.१६ फेब्रुवारी २०१२ रोजी निधन झाल्यावर त्यांनी आपल्या कुटुंबाचा प्रतिकूल काळात भार उचलला होता.
त्यांच्यावर कोपरगाव येथील गोदावरीकाठी असलेल्या नगरपरिषदेच्या अमरधाममध्ये शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.