निधन वार्ता
माजी सरपंच कबाडी यांचे निधन

न्यूजसेवा
कुंभारी-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील कुंभारी येथील ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच मथुराबाई वाल्मीक कबाडी (वय-६५)यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले आहे.त्यांचा अंत्यविधी गोदावरी कुंभारी येथे शोकाकुल वातावरणात करण्यात आला आहे.त्यांच्या पश्चात पती वाल्मीक धोंडीबा कबाडी,तीन मुली नातवंडे असा मोठा परिवार आहे.
स्व.मथुराबाई काबाडी या अत्यंत धार्मिक व मन मिळवू स्वभावाच्या म्हणून कुंभारी आणि परिसरात प्रसिद्ध होत्या.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.