सहकार
…या सहकारी बँकेचा एन.पी.ए.शून्य टक्के-माहिती

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यात सहकारात अग्रणी असलेल्या गौतम सहकारी बँकेच्या नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात शून्य टक्के नेट एन.पी.ए.राखण्यात यश मिळविले असून मागील आर्थिक वर्षात बँकेला ३.३९ कोटी ढोबळ नफा झाला असून त्यात मागील वर्षाच्या तुलनेत ७.१० टक्क्यांनी वाढ झालेली आहे अशी माहिती बँकेचे उपाध्यक्ष बापूराव जावळे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

“दरम्यान गौतम सहकारी बँक निफाड तालुक्यातील खेडले झुंगे आणि येवला येथे ०२ नवीन शाखा सुरु करणार आहे.व आगामी काळात बँकेत लवकरच मोबाइल बैंकिंग प्रणाली सेवा,तसेच आज रोजी भारत बिल पेमेंट सिस्टीमद्वारे ग्राहक फोन बिल,इलेक्ट्रीसिटी बिल,मोबाईल बिल भरण्याची सेवा ग्राहकांना देणार आहे”-बापूराव जावळे,उपाध्यक्ष,गौतम सहकारी बँक,गौतमनगर.
त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या आपल्या पत्रकात म्हटले आहे की,”काही सन-२००४ च्या सुमारास बरेच वर्ष तोट्यात असणाऱ्या गौतम बँकेने कात टाकून मागील काही वर्षापासून मोठा नफा मिळविण्यास प्रारंभ केला आहे.मागील आर्थिक वर्षात बँकेचा नेट एनपीए पहिल्यांदाच शून्य टक्के झालेला आहे.बँकेने २०१८ साली व कोरोनामुळे रिझर्व्ह बँकेच्या सूचनेनुसार काही काळ थांबून मागील वर्षापासून सभासदांना लाभांश देखील देण्यास प्रारंभ केलेला आहे आणि या पुढील काळातही बँक सभासदांना दरवर्षी लाभांश देण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.चालू वर्षी गौतम सहकारी बँकेच्या निफाड तालुक्यातील खेडले झुंगे आणि येवला येथे ०२ नवीन शाखा सुरु होणार आहे.यापुढील काळात बँकेत लवकरच मोबाइल बैंकिंग प्रणाली सेवा,तसेच आज रोजी भारत बिल पेमेंट सिस्टीमद्वारे ग्राहक फोन बिल,इलेक्ट्रीसिटी बिल,मोबाईल बिल भरण्याची सेवा अशा विविध सेवा ग्राहकांना देण्यात येत असल्याची माहिती बँकेचे व्यवस्थापकीय संचालक प्रवीण पावडे आणि प्रशासकीय अधिकारी बापूसाहेब घेमूड यांनी दिली आहे.
दरम्यान संस्थेच्या या यशात बँकेचे दिवंगत अध्यक्ष स्व.सुधाकर दंडवते,उपाध्यक्ष,संचालक मंडळ,सभासद व सर्व प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी,बँकेचे ठेवीदार,कर्जदार,ग्राहक यांचे योगदान असून सर्व अभिनंदनास पात्र असल्याचे आ.आशुतोष काळे यांनी शेवटी म्हटले आहे.