जाहिरात-9423439946
शैक्षणिक

कोपरगावातील… या महाविद्यालयाचा फिलिपिन्स विद्यापीठाशी करार

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव येथील स्थानिक के.जे.सोमैया महाविद्यालयात फिलिपिन्स मधील परप्युच्यूअल हेल्प सिस्टीम डाल्टा मोलिनो विद्यापीठाशी सामंजस्य करार नुकताच ऑनलाईन पद्धतीने संपन्न झाल्याची माहिती प्राचार्य डॉ.बी.एस.यादव यांनी दिली आहे. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

दरम्यान या प्रसंगी कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक रोहमारे यांनी हा सामंज्यस करार महाविद्यालयाची मोठी उपलब्धी असल्याचे नमूद केले.तसेच संस्थेचे सचिव अड्.संजीव कुलकर्णी व विश्वस्त संदीप रोहमारे यांनी सामंजस्य कराराबद्दल समाधान व्यक्त केले.

प्राचार्य डॉ.बी.एस.यादव पुढे म्हणाले कि,”या सामंजस्य कराराच्या अंतर्गत दोन्ही शैक्षणिक संस्थांच्या दरम्यान स्टुडन्ट एक्सचेंज,फॅकल्टी एक्स्चेंज,अंतरराष्ट्रीय चर्चासत्रे व परिसंवाद, संशोधनाचे विविध उपक्रम तसेच सांस्कृतिक आदान-प्रदान यास चालना मिळणार आहे.
कोपरगाव सारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अंतरराष्ट्रीय शैक्षणिक उपक्रमात या करारामुळे सहभाग घेता येईल. विद्यार्थ्यांबरोबरच संस्थेतील प्राध्यापकांनाही या विद्यापीठात अध्ययन-अध्यापन,संशोधन यामध्ये सहभागी होता येईल.

या सामंजस्य करारावेळी परप्युच्यूअल विद्यापीठ फिलिपिन्सचे अध्यक्ष डॉ.अन्थोंनी जोस एम. तमायों,स्कूल डायरेक्टर डॉ.रिनो आर.रेयल,कॉलेज ऑफ टेकनॉलॉजीचे डीन व सामंजस्य कराराचे समन्वयक डॉ.पास्टर अरग्युलस ज्यु.प्राध्यापिका मिरा रामीरेझ तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.एस.यादव,अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ.विजय ठाणगे,सामंजस्य कराराचे समन्वयक डॉ.रवींद्र जाधव व महाविद्यालयाचे प्रबंधक डॉ.अभिजीत नाईकवाडे हे मान्यवर उपस्थित होते.

या कराराच्या वेळी डॉ.रिनो आर.रेयल म्हणाले कि भारतातील के.जे.सोमैया महाविद्यालयाशी झालेल्या या करारामुळे शैक्षणिक,संशोधनात्मक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन अंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचण्यास मदत होईल.लवकरच आम्ही सोमय्या महाविद्यालयाला शैक्षणिक भेट देणार असून तेथील व्यवस्थापन,प्राचार्य,प्राध्यापक व विद्यार्थी यांच्याशी सुसंवाद साधणार आहे.

या कार्यक्रमाची सुरुवात दोन्ही देशांच्या राष्ट्रगीत गायनाने झाली.कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात सोमय्या महाविद्यालयाचे सामंजस्य कराराचे महाविद्यालयाचे समन्वयक डॉ.रवींद्र जाधव यांनी ह्या कराराद्वारे महाविद्यालयातील प्राध्यापक,विद्यार्थी यांना शैक्षणिक व सांस्कृतिक आदान-प्रदान करण्याची संधी निर्माण होणार आहे.महाविद्यालयाने नुकतेच जुलै महिन्यात मलेशियातील यु. आय.टी.एम.मारा विद्यापीठाशी यशस्वी सामंजस्य करार केलेला आहे असे नमूद केले.
कार्यक्रमाच्या समारोपात परप्युच्यूअल विद्यापीठातील या कराराचे समन्वयक डॉ. पास्टर आरग्युलस ज्यु म्हणाले कि या सामंजस्य करारामुळे अंतरराष्ट्रीय चर्चासत्रे,शोधनिबंध,संशोधन प्रकल्प व अंतरराष्ट्रीय व्याख्यानमालेचे आयोजन पुढील काळात करण्यात येईल.

दरम्यान शेवटी उपस्थितांचे गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ.विजय ठाणगे यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close