जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगावात दोन गटात तुंबळ हाणामारी,तीन जखमी,गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील डाऊच खु.ग्रामपंचायत हद्दीत रहिवासी असलेल्या दोन गटात किरकोळ पण राजकीय कारणावरून तुंबळ हाणामारी झाली असून या बाबत तीन जण गंभीर जखमी झाले असून या बाबत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दोन्ही गटांनी १९ जणांनीं एकमेकांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहे.जखमींवर कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका गत डिसेंबर मध्ये संपन्न झाल्या होत्या.त्यात कोपरगाव तालुक्यातील डाऊच खु. ग्रामपंचायतीचा समावेश होता.त्यात संजय गुरसळ गटाचा विजय होऊन त्यात गुरसळ यांची पत्नी नेहा गुरसळ विजयी झाल्या होत्या.त्यात परजणे गटातील एक गट गुरसळ गटास मिळाला होता.त्यामुळे त्या गटास सलग दुसऱ्यांदा विजयाची संधी मिळाली होती.त्याचा अच्छा खांसा राग परजणे गटाच्या कार्यकर्त्याना होता.त्यात दोन्ही गटात अल्पसंख्याक समाजातील कार्यकर्ते सहभागी होते.त्यातून वारंवार किरकोळ कारणारून वाद विवाद होत असल्याचे अनेक जाणकारांचे म्हणणे आहे.त्यातून शुक्रवार दि.०७ जुलै रोजी रात्री ०९.३० वाजता हि दुर्दैवी घटना घडली आहे.

राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका गत डिसेंबर मध्ये संपन्न झाल्या होत्या.त्यात कोपरगाव तालुक्यातील डाऊच खु. ग्रामपंचायतीचा समावेश होता.त्यात संजय गुरसळ गटाचा विजय होऊन त्यात गुरसळ यांची पत्नी नेहा गुरसळ विजयी झाल्या होत्या.त्यात परजणे गटातील एक गट गुरसळ गटास मिळाला होता.त्यामुळे त्या गटास सलग दुसऱ्यांदा विजयाची संधी मिळाली होती.त्याचा अच्छा खांसा राग परजणे गटाच्या कार्यकर्त्याना होता.त्यात दोन्ही गटात अल्पसंख्याक समाजातील कार्यकर्ते सहभागी होते.त्यातून वारंवार किरकोळ कारणारून वाद विवाद होत असल्याचे अनेक जाणकारांचे म्हणणे आहे.त्यातून शुक्रवार दि.०७ जुलै रोजी रात्री ०९.३० वाजता गुरसळ व परजणे या दोन गटात समृद्धी महामार्गाजवळ पुलाखाली वाद निर्माण होऊन त्याचे पर्यवसान थेट हाणामारीत झाले आहे.त्यात त्यांनी लोखंडी रॉड आणि काठ्यांच्या वापर केला आहे.

त्यातून पहिली फिर्याद लालमोहमंद गणी सय्यद (वय-४५) यांनी दाखल केला असून त्यात त्यांनी आरोपी म्हणून जावेद अयोग नुद्दीन पठाण,मुन्ना आबा सय्यद,भैय्या अब्बास सय्यद,शाहरुख सलीम सय्यद,चंद्रकांत बाजीराव गुरसळ,अस्लम शहाबुद्दीन सय्यद,बापू अब्बास सय्यद,जाहिद मेहमूद सय्यद,मुस्ताक मोहंमद सय्यद,संजय भागवत गुरसळ सर्व रा.डाऊच खु.यांचे विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.त्यांनी या घटनेत लाल मोहंमद गुलाब गणी सय्यद,हुझेफ्फा लाल मोहंमद सय्यद आदी तीन जखमी झाल्याने म्हटले आहे.त्यांच्यावर संत जनार्दन स्वामी रुग्णालय व कोपरगाव ग्रामीण रुग्णालय येथे उपचार सुरु आहे.

दरम्यान दुसऱ्या गुन्ह्यात शारुद्दीन सलीम शेख फिर्यादी असून त्यांनी आपल्या फिर्यादीत म्हटलं आहे की,”आरोपी आश्पाक शेख,हुझेप्पा लाल मोहंमद सय्यद,रियाज शफीक सय्यद,फैयाज शबीर सय्यद, साजिद हसन शेख,लाल मोहमंद गुलाब गणी सय्यद,समीर मुन्ना सय्यद,शफीक गुलाब गणी सय्यद,शब्बीर गुलाब गणी सय्यद,आदी सर्व रा.डाऊच खुर्द आदींनी गैरकायद्याची मंडळी जमवून फिर्यादी व साक्षिदार यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली असून आमच्यावर हल्ला केला आहे.यात शारुद्दीन सलीम शॆख (वय-३०) हा इसम जखमी झाला आहे.व तुम्ही जास्त शहाणपणा केला तर तर तुमचे डोके फोडून टाकू

यातील काही आरोपींना कोपरगाव पोलिसांनी अटक केली असून घटनास्थळी पोलीस निरीक्षक रामराव ढिकले,पो.हे.कॉ.के.ए.जाधव यांनी भेट दिली आहे.

दरम्यान या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी आपल्या दप्तरी गुन्हा अनुक्रमे क्रं.३२१३२५/२०२३ भा.द.वि.कलम ३२४,३२३,१४३१४७,१४८,१४९,५०४,५०६,३४ प्रमाणे १९ आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक रामराम ढिकले यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस पो.हे.कॉ.जाधव हे करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close