आरोग्य
कोपरगाव तालुक्यातील ..या महाविद्यालयात लसीकरण पूर्ण

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथील के.बी.रोहमारे कनिष्ठ महाविद्यालय चासनळी येथील विद्यार्थ्यांना कोरोना लसीकरणाचा दुसरा डोस पूर्ण करण्यात आला आहे.
करोना संकटावर मात करण्यासाठी देशात मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहिम राबवली जात आहे. अनेक राज्यांनी तर मोफत लसीकरण सुरू केलंय. केंद्र सरकारने १८ वर्षांवरील सर्वांना लसीकरणासाठी परवानगी दिली आहे.त्यामुळे चासनळी येथे महाविद्यालयात लसीकरण पूर्ण करण्यात आले असल्याची माहिती प्राचार्य नारायण बारे यांनी दिली आहे.
इयत्ता बारावी विज्ञान व वाणिज्य विभागातील विद्यार्थ्यांच्या बोर्ड परीक्षा जवळ असतानाच शासनाच्या नियमाप्रमाणे लसीकरण करणे गरजेचे असल्यामुळे चासनळी ग्रामीण रुग्णालय यांच्या सहकार्याने व प्राचार्य बारे एन.जी.यांच्या पाठपुराव्याने महाविद्यालयातील सर्व २२५ विद्यार्थ्यांचे लसीकरण यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले आहे.
लसीकरणाचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगून एच.एस.सी बोर्ड परीक्षेसाठी प्राचार्य एन.जी.बारे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
यावेळी चासनळी ग्रामीण रुग्णालयाचे कर्मचारी आर.एस.शेख,रामेश्वर इंगळे,आरोग्य सहाय्यक श्रीमती गाताडे,श्रीमती देवकर,श्रीमती वाबळे,आशा सेविका विना ससाने,दिपाली वैद्य,आशा धेनक,श्रीमती कदम आदी मान्यवर उपस्थित होते.