जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
नगर जिल्हा

महात्मा ज्योतिबा फुले यांचे…या शहरात तैल चित्र हवे-मागणी

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

नगर शहरातील बहुप्रतिक्षेत उड्डाणपुलाचे जे पोल आहेत त्यावर सामान्य जणांसाठी शिक्षणाची कवाडे खुली करणारे महात्मा ज्योतिबा फुले यांचे तैलचित्र असावे अशी मागणी श्री संत सावता माळी युवक संघाने केली असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष सचिन भाऊसाहेब गुलदगड यांनी दिली आहे.

“स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची रायगडावर असलेली समाधी मोठ्या कष्टाने महात्मा फुलेंनी शोधून काढुन शिवजयंती साजरी करण्याचे महत्वपूर्ण केले आहे.हे समस्त राष्ट्राला माहिती आहे.त्यांच्या या कार्याची माहिती सामान्य नागरिकांना मिळावी यासाठी त्यांचे नगर शहरातील उड्डाण पुलाच्या स्तंभावर तैलचित्र असावे”-सचिन गुलदगड,अध्यक्ष,श्री संत सावता माळी युवक संघटना.

स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची रायगडावर असलेली समाधी मोठ्या कष्टाने महात्मा फुलेंनी शोधून काढुन शिवजयंती साजरी करण्याचे महत्वपूर्ण केले आहे.हे समस्त राष्ट्राला माहिती आहे.त्यांच्या या कार्याची माहिती सामान्य नागरिकांना मिळावी यासाठी त्यांचे नगर शहरात तैलचित्र असावे व ते नुकत्याच पूर्ण झालेल्या उड्डाण पुलाच्या स्तंभावर असावे अशी मागणी श्री संत सावता माळी युवक संघाने केली असल्याचे प्रतिपादन श्री संत सावता माळी यूवक संघटनेचे अध्यक्ष सचिन भाऊसाहेब गुलदगड यांनी केले आहे.

याबाबत नुकतीच नगर शहराचे आ.संग्राम जगताप तसेच नगर महापालिकेचे आयुक्त पंकज जावळे,उपमहापौर गणेश भोसले आदिंच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली आहे.यात हा विषय श्री संत सावता माळी युवक संघटनेचे अध्यक्ष सचिन गुलदगड यांनी मांडला आहे.

सदर प्रसंगी नगर शहर राष्ट्रवादीचे नगर शहर जिल्हाध्यक्ष माणिकराव विधाते,समता परीषदेचे अंबादास गारुडकर,अशोक गोरे,अशोकराव कानडे,भाऊ बोरुडे,सुनिल कोतकर,दिपक खेडकर,आमित खामकर,विष्णुपंत म्हस्के,म्हाळु गाढळकर,ऋषी ईवळे,आदिनाथ आंबेकर,महापालिका रचनाकार विभागाचे श्री ईथापे,किरण जावळे,संतोष हजारे,ॲड.राहुल रासकर,डॅा.योगेश चिपाडे आदि मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close