जाहिरात-9423439946
कोपरगाव शहर वृत्त

पूर्वीप्रमाणे कोपरगावात तीन दिवसाआड पाणी पुरवठा करा-माजी नगराध्यक्ष

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

मागील दीड महिन्यापूर्वी नगरपालिकेने अचानक २८ नोव्हेंबर ला पाणी आठवड्यातून एक दिवस म्हणजे ७ दिवसांनी पाणी देणार असे जाहीर केले असून त्यामुळे शहरातील महिला वर्ग नाराज झाला असून कोपरगाव नगरपरिषदेने पूर्ववत पाणी पूरवठा करावा अशी मागणी कोपरगाव नगर परिषदेचे माजी अध्यक्ष मंगेश पाटील यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना केली आहे.

“शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ नाशिक येथील जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटून त्यांनी कालवा सल्लागार समितीची बैठक लाभक्षेत्रात घ्यावी अशी कळकळीची मागणी केली होती.मात्र त्यांच्या तोंडाला पाने पुसली असून शहरातील नागरिकांना कालवा दुरुस्तीच्या नावाखाली पाण्याचे आवर्तन उशिरा म्हणजेच सहा दिवसाड केले आहे.आता आठ्वड्यापूर्वी आवर्तन सुरु झाले असतानाही त्यात अद्याप बदल केला नाही”-मंगेश पाटील,माजी अध्यक्ष,कोपरगाव नगरपरिषद.

कोपरगाव,राहाता,सिन्नर,श्रीरामपूरसह गोदावरी कालव्यांच्या लाभक्षेत्रात या वर्षीं मुबलक पर्जन्य झाला आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना या वर्षी रब्बीचे आणि पिण्याचे जास्त आवर्तन मिळेल अशी अपेक्षा होती.मात्र झाले उलटेच आहे.या वर्षी जलसंपदा विभागाने आवर्तन वाढीव दिले तर नाही पण उलट रब्बीचे आवर्तन कमी करून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहे.या आधीच शेतकऱ्यांनी जलसिंचनासाठी कालवा सल्लागार समितीची बैठक कोपरगाव येथे घ्यावी अशी मागणी वारंवार करूनही त्याकडे जलसंपदा विभाग व राजकीय नेते दूर्लक्ष करत आहे.विशेष म्हणजे राजकीय नेत्यांनी त्यांच्या होत हो मिळवला आहे हे विशेष !

गत हंगामात दि.१६ मे २०२२ रोजी शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ नाशिक येथील जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटून त्यांनी कालवा सल्लागार समितीची बैठक लाभक्षेत्रात घ्यावी अशी कळकळीची मागणी केली होती.मात्र त्यांच्या तोंडाला पाने पुसली असून शहरातील नागरिकांना कालवा दुरुस्तीच्या नावाखाली पाण्याचे आवर्तन उशिरा म्हणजेच सहा दिवसाड केले आहे.आता आठ्वड्यापूर्वी आवर्तन सुरु झाले असतानाही त्यात अद्याप बदल केला नाही विशेष ! त्यामुळे महिला आणि नागरिकांत संताप व्यक्त होत आहे.

आत्ता कालव्याला पाणी आले असून नगरपालिकेने सर्व साठवण तलाव पूर्ण क्षमतेने भरून घ्यावे व बंद होताना लक्ष ठेऊन काळजीने व जबाबदारीने भरून घ्यावे.परिणामस्वरूप नागरिकांना येणाऱ्या काळात त्रास होणार नाही.त्यांची घैरसोय होणार नाही.कारण नगरपालिकेचा पाणी मंजूर कोठ्या पेक्षा नगरपालिका पाणी कमी घेते कारण साठवण तळे गाळानी भरले असून,त्याची साठवण क्षमता कमी झाली आहे.त्या मुळे कालवे सुटल्यावर व बंद होताना दोन्ही वेळा भरून घ्वावे,कारण आपल्याला आपल्या हक्काचे पिण्याचे पाणी मंजूर आहे आणि त्याची पट्टी नगरपालिका शासनाला पाटबंधारे विभागाला जनतेच्या कररुपी भरलेल्या पैशातून देते.तरी नगरपालिकेनी पूर्वी प्रमाने तीन दिवसाआड म्हणजे चौथ्या दिवशी पाणी पुरवठा तत्काळ करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी शेवटी मंगेश पाटील यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close