नगर जिल्हा
राजेंद्र कोतेंकडून महाविद्यालयास दुचाकी भेट
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव (प्रतिनिधी)
शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानचे संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे यांच्या यांच्या मान्यतेने महाविद्यालयाचे प्राचार्य विकास शिवगजे,दिनेश कानडे, मनोज बकरे,रामनाथ कासार, सुदाम कालेकर आदि कर्मचाऱ्यांनी या भेटीचा स्वीकार केला आहे.
महाविद्यालयात आवश्यक तातडीच्या गरजा भागविण्यासाठी राजेंद्र कोते नेहमीच पुढाकार घेत असतात अशी माहिती प्राचार्य विकास शिवगजे यांनी दिली.
यापूर्वी राजेंद्र कोते संस्थानच्या संरक्षण विभागात कार्यरत असतांना दिव्यांग भक्तांच्या सुविधेसाठी दहा हजार रुपये किंमतीचे व्हीलचेअरचे व्हील, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत ओळखपत्र तयार करण्यासाठी लॅमिनेशन मशीन,महाविद्यालयात महापुरुषांचे फोटो,पिण्याच्या पाण्यासाठी आर. ओ. सिस्टीम व प्रिंटर देणगी दिली आहे.यावेळी शिर्डी दूध सोसायटीचे उपाध्यक्ष भागवत कोते,रागिणी कोते यांच्या हस्ते वाहनाची पूजा करण्यात आली.प्रशासकीय अधिकारी दिलीप उगले यांनी आनंद व्यक्त करून कोते यांचे आभार मानले.