नगर जिल्हा
कर्मवीर काळे कारखान्याची शनिवारी वार्षिक सभा
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव (प्रतिनिधी )
कोपरगाव तालुक्यातील कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याची सन २०१८-१९ या वर्षातील अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार दि.३१ ऑगष्ट रोजी दुपारी २.०० वाजता कारखाना कार्यस्थळावरील कर्मवीर मैदानावर कारखान्याचे अध्यक्ष आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.
कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना हा आशिया खंडातील सहकारी तत्त्वावरील दुसरा साखर कारखाना आहे.हा कारखाना उभारणीत शेतकऱ्यांचे मोठे योगदान होते.हा कारखाना माजी खा.शंकरराव काळे यांनी यशोशिखरावर नेला.
यावेळी माजी आ. अशोक काळे उपस्थित राहणार आहेत. तरी सर्व सभासदांनी अधिमंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेस मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन कारखान्याचे कार्यकारी संचालक गिरीश जगताप यांनी शेवटी केले आहे.