जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
नगर जिल्हा

कुटुंबा प्रमाणे “माझे गाव,माझी जबाबदारी”महत्वाची-आदिक

जनशक्ती न्यूजसेवा

श्रीरामपूर-(प्रतिनिधी)

“माझे कुटुंब,माझी जबाबदारी”हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व डॉक्टर्स,आरोग्य सेवक यांचेसह आशा सेविकांचे योगदान महत्वाचे ठरणार आहे.माझ्या कुटुंबा प्रमाणेच माझी जबाबदारी प्रमाणेच “माझे गाव,माझी जबाबदारी” समजून आपण सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी नुकतेच केले आहे.

आजारपेक्षा त्याचा प्रतिबंध बरा.आपण आपली स्वतःची व परिवाराची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. नगरपरिषदेच्यावतीने आवश्यक त्या सर्व उपाययोजना राबविण्यात येत आहेत.नागरिकांनीही कुठल्याही आजार असेल तर त्याबाबत तातडीने तपासणी करणे गरजेचे आहे-अनुराधा आदिक

श्रीरामपुर नगरपालिकेच्या वतीने कोरोना नियंत्रित करण्यासाठी माझे कुटुंब माझी जबाबदारी या उपक्रमाची सुरुवात प्रभाग सहा मध्ये नुकतीच झाली आहे.याप्रसंगी त्या बोलत होत्या.

यावेळी नगरसेवक रवी पाटील,शिवसेनेचे सचिन बडधे,शैलेश बाबरिया,राहुल सराफ,डॉ.सचिन प-हे डॉ.संकेत मुंदडा,निलेश बाबरिया,शिवाजी सोनवणे,डॉ. उमेश लोंढे,संजय पवार,निखील पवार,गुळस्कर काका,रमेश चंदन,सागर बडधे,राजू झांझरी,कार्तिक मंडवे,वायंदेशकर,आरोग्य सेविका आशा सेविका,उपमुख्याधिकारी कवीटकर,आरोग्याधिकारी आरणे आदींसह अनेक नागरिक उपस्थित होते.

यावेळी आदिक पुढे बोलताना म्हणाल्या की,”आजारपेक्षा त्याचा प्रतिबंध बरा.आपण आपली स्वतःची व परिवाराची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. नगरपरिषदेच्यावतीने आवश्यक त्या सर्व उपाययोजना राबविण्यात येत आहेत.नागरिकांनीही कुठल्याही आजार असेल तर त्याबाबत तातडीने तपासणी करणे गरजेचे आहे.शहरात करोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी सर्व व्यापारी व नागरिकांनी शहरात स्वयंस्फुर्तीने बंद पाळलेला आहे.आरोग्य केंद्राच्या आशाताई शहरातील प्रत्येक घरी जावून घरातील सर्व सदस्यांची तपासणी करणार आहे.त्यामध्ये ताप,ऑक्सिजन,फ्लू सदृश आजाराची तपासणी करणार आहेत.तसेच घरातील सदस्यांना इतर कुठले आजार आहेत याची देखील नोंद करणार आहे.तण ज्या नागरिकांना करोना संसर्गाची लक्षणे असतील त्यांची तातडीने अ‍ॅन्टीजेन,स्राव तपासणी करण्यात येईल.तसेच नागरिकांमध्ये करोना संसर्ग होवू नये यासाठी जागृती देखील करण्यात येणार आहे. यावेळी उपस्थितांचे आभार डॉ.संकेत मुंदडा यांनी मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close