नगर जिल्हा
कर्मवीर काळे कारखान्याच्या उपाध्यक्षपदी पद्माकांत कुदळे यांची निवड
July 29, 2019
287 Less than a minute
कोपरगाव (प्रतिनिधी)महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रात अग्रगण्य असणा-या कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथील कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी जेष्ठ संचालक पद्माकांत शंकरराव कुदळे यांची निवड करण्यात आली आहे.
कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुनील शिंदे यांनी नुकताच वरिष्टांच्या आदेशाने आवर्तनांनुसार काही दिवसांपूर्वी राजीनामा दिला होता.या पार्श्वभूमीवर संचालक मंडळाची बैठक नुकतीच मोठ्या उत्साहात संपन्न झाली त्यावेळी झालेल्या बैठकीत एकमताने उपाध्यक्षपदी पदमकांत कुदळे यांची निवड करण्यात आली आहे.
संचालक पद्माकांत कुदळे यांच्या नावाची सुचना संचालक विश्वास आहेर यांनी मांडली त्या सूचनेला संचालक ज्ञानदेव मांजरे यांनी अनुमोदन दिले. आपल्या निवडीबद्दल बोलतांना नवनिर्वाचित उपाध्यक्ष पद्माकांत कुदळे म्हणाले की, माजी खासदार शंकरराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली व माजी आमदार अशोक काळे यांनी मोठ्या विश्वासाने या सहकारी संस्थेचे हित जोपासले आहे. सभासद, कामगार व तालुक्यातील व्यापारी वर्गाची कामधेनु असलेल्या संस्थेची टाकलेली जबाबदारी खूप मोठी आहे. माजी खा. काळे यांचे विचार डोळ्यासमो उद्योग समूहाची प्रगती साधण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले आहे.
यावेळी कारखान्याचे सर्व संचालक मंडळ, कार्यकारी संचालक गिरीश जगताप, सचिव सुनील कोल्हे,कार्यालयीन अधीक्षक बाबा सय्यद व पदाधिकारी उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नगर येथील प्रादेशिक सहसंचालक बाजीराव शिंदे व सहाय्यक म्हणून श्री सूरम यांनी काम पाहिले.
——————
फोटो ओळ- कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी पद्माकांत कुदळे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करतांना कारखान्याचे अध्यक्ष आशुतोष काळे, समवेत माजी आमदार अशोक काळे, मावळते उपाध्यक्ष सुनील शिंदे कार्यकारी संचालक गिरीश जगताप, निवडणूक निर्णय अधिकारी बाजीराव शिंदे आदी मान्यवर छायाचित्रात दिसत आहेत.