नगर जिल्हा
जिल्हा परिषद शिक्षकाचे प्रशासकीय बदल्या रद्द
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकाचे प्रशासकीय बदल्या पुर्णपणे रद्द केल्या असून फक्त विनंतीनुसार जिल्हा अंतर्गत बदल्या करण्यासाठी शासनाने आज पत्र काढले असल्याचे पत्रक राजेंद्र शिंदे यांनी आमच्या प्रतिनिधीस माहिती साठी प्रसिध्दीस दिले आहे.
अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने आ.निलेश लंके यांच्या माध्यमातून ग्रामविकास तथा पालकमंत्री मंत्री ना. हसन मुश्रीप यांची भेट घेऊन प्राथमिक शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्या न करता फक्त विनंती बदल्या समुपदेशनाने कराव्यात असे निवेदन दिले होते.त्यावेळी शिक्षकांच्या बदली प्रक्रियेत कोणावरही अन्याय होऊ देणार नाही व तसे आदेश निर्गमित करण्याचे आश्वासन दिले होते.
महाराष्ट्र शासन या पुर्वी दि १५ जुलैच्या पत्रा नुसार राज्यातील जिल्हा परिषद कर्मचारी व शिक्षकाचे फेब्रुवारी २०१४ च्या शासन आदेशानुसार नुसार प्रशासकीय व विनंतीनुसार बदल्या करण्यात याव्यात असे कळविले होते.त्या प्रमाणे जिल्हा परिषद कर्मचाऱ्याचे बदल्या ही झाल्या मात्र शिक्षकाचे संख्या मोठी असल्याने अनेक अडचणी मुळे बदल्या थांबल्या होत्या.महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने( शिवाजीराव पाटील गट) राज्यातील जिल्हा परिषद शिक्षकाचे प्रशासकीय बदल्या रद्द करून फक्त विनंतीनुसार बदल्या करण्यात यावी अशी मागणी केली होती त्या अनुषंगाने राज्य शासन कोवीड-१९ प्रादुर्भाव विचारात घेऊन शिक्षकाचे संख्या मोठी असल्याने बदल्याच्या वेळी समुपदेशन करताना सुरक्षित अंतर पाळणे अवघड आहे म्हणून शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्या पुर्णपणे रद्द केल्या आहेत. फक्त विनंतीनुसार जिल्हा अंतर्गत बदल्या दि.१५ जुलैच्या पत्रानुसार विहीत मुदतीत करण्याच्या सुचना दिल्या आहेत.अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने आ.निलेश लंके यांच्या माध्यमातून ग्रामविकास तथा पालकमंत्री मंत्री ना. हसन मुश्रीप यांची भेट घेऊन प्राथमिक शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्या न करता फक्त विनंती बदल्या समुपदेशनाने कराव्यात असे निवेदन दिले होते.त्यावेळी शिक्षकांच्या बदली प्रक्रियेत कोणावरही अन्याय होऊ देणार नाही व तसे आदेश निर्गमित करण्याचे आश्वासन दिले होते त्याप्रमाणेआदेश सर्व जिल्हा परिषदांना दि.५ ऑगष्ट रोजी प्राप्त झाले आहेत.या निर्णयाबद्दल ना.मुश्रीप व आ.निलेश लंके यांचे जिल्हा संघ अध्यक्ष राजेंद्र शिंदे. सदिच्छा मंडळ अध्यक्ष रविंद्र पिंपळे,मोहनराव शिंदे,अनिल आंधळे,राजू कुदनर,ज्ञानेश्वर माळवे,उद्धव मरकड,सुभाष खेडकर,बाबा आव्हाड,चंद्रकांत मोढवे, बाळासाहेब खिलारी,नवनाथ तोडमल,गोकुळ कळमकर,माधव हासे,शैलेश खणकर,सय्यद अली आदींनी आभार मानले आहेत.