जाहिरात-9423439946
नगर जिल्हा

शिर्डी नगरसेवक अपहरण प्रकरणी शासनास उच्च न्यायालयाची नोटिस !

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

शिर्डी येथील म.न.से.पक्षाचे नगरसेवक दत्तात्रय शिवाजी कोते यांचे २४ जून २०१९ रोजी राजकीय सूडातून काही अज्ञात व्यक्तीने नगर-मनमाड रस्त्यावरून पुण्याला जात असताना बाभळेश्वर गावाजवळून अपहरण केल्या प्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या.टी.व्ही नलावडे व न्या.एम.जी.सेवळीकर यांनी राज्य शासनाच्या गृह विभागास व पोलीस निरीक्षक,लोणी पोलीस ठाणे यांना नोटीस बजावल्याने खळबळ उडाली आहे.

शिर्डी येथील म.न.से.पक्षाचे नगरसेवक दत्तात्रय शिवाजी कोते यांचे २४ जून २०१९ रोजी राजकीय सूडातून काही अज्ञात व्यक्तींनी नगर-मनमाड रस्त्यावरून पुण्याला जात असताना बाभळेश्वर गावाजवळून शस्राचा धाक दाखवून रात्री २ च्या सुमारास ४ अज्ञात इसमांनी अपहरण करून नेले होते.त्यानंतर अपहरण करणाऱ्या सूत्रधाराचा एका आरोपीला फोन आल्यावर दत्तात्रय शिवाजी कोते यांना राजकारणात परत पडू नको अशी धमकी देऊन मध्यरात्री रस्त्यात त्यांच्या जवळचे पैसे घेऊन त्यांना सोडून दिले होते त्यावर हि याचिका फिर्यादी मार्फत उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,शिर्डी येथील म.न.से.पक्षाचे नगरसेवक दत्तात्रय शिवाजी कोते यांचे २४ जून २०१९ रोजी राजकीय सूडातून काही अज्ञात व्यक्तींनी नगर-मनमाड रस्त्यावरून पुण्याला जात असताना बाभळेश्वर गावाजवळून शस्राचा धाक दाखवून रात्री २ च्या सुमारास ४ अज्ञात इसमांनी अपहरण करून नेले होते.त्यानंतर अपहरण करणाऱ्या सूत्रधाराचा एका आरोपीला फोन आल्यावर दत्तात्रय शिवाजी कोते यांना राजकारणात परत पडू नको अशी धमकी देऊन मध्यरात्री रस्त्यात त्यांच्या जवळचे पैसे घेऊन त्यांना सोडून दिले.त्यांनंतर अज्ञात व्यक्तींविरुद्ध लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.या घटनेतील तपासा दरम्यान ४ आरोपीना अटक करण्यात आली होती.त्यांची तपासदरम्यान ओळखपरेड करण्यात आली नव्हती.सदर गुन्हयात आजवर आरोपी विरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले नसून अपहरणाचा मुख्य सूत्रधाराला वाचवण्यासाठी पोलीस प्रयत्न करत असल्याचे आरोप याचिकार्ते दत्तात्रय शिवाजी कोते यांनी त्यांच्या तक्रारीमध्ये नमूद केले आहे.अपहरणाचा मुख्य सूत्रधार विजय तुळशीराम कोते,नगरसेवक ताराचंद कोते (काँग्रेस पक्ष ) यांचे बंधू ह्यांनी २६ जून २०२० रोजी हॉटेल सिद्धांत,शिर्डी येथे सर्वपक्षीय बैठक आयोजित करून दत्तात्रय शिवाजी कोते यांची माफी मागितली व त्यांच्या सांगण्यावरून आरोपीने अपहरण केले होते. सदर अपहरण राजकीय सूडातून झाल्याचे त्यांनी कबुल करून व याचिकाकर्ते यांनी तक्रारी मागे घ्यावी अशी विनंती केली होती. त्यानंतर दि ०१ जुलै २०२० रोजी याचिकाकर्त्याना व त्यांच्या पत्नीस विजय तुळशीराम कोते व इतर यांनी त्यांच्या घरी जाऊन तक्रारी माझे घेण्यासाठी पैशाचे प्रलोभन दाखविली व तसे न केल्यास जीवे मारण्याची धमकी देखील दिली होती.

सदर घटनेची तक्रार दत्तात्रय शिवाजी कोते यांनी पोलीस ठाणे शिर्डी येथे करून देखील कोणतीही कार्यवाही झाली नाही.याचिकाकर्त्यांनी पोलीसने सदर बैठकीचे चलचित्रणाची फित जप्त करून अपहरण प्रकरणाचा तपास करावा अशी विनंती केली होती.विजय तुळशीराम कोते यांचे सि.डी.आर.तपासावा अशी देखील विनंती केली होती.पोलीस प्रशासन विजय कोते यांना पाठीशी घालत असल्यामुळे याचिकाकर्ते यांनी उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे फौजदारी यांची दाखल करून सदर प्रकरणात सी.आय.डी.मार्फत चौकशी व्हावी अशी विनंती केली होती.सदर प्रकरणात उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबादचे न्या.टी.व्ही नलावडे व न्या.एम.जी.सेवळीकर यांनी राज्य शासन (गृह विभाग) व पोलीस निरीक्षक,लोणी पोलीस ठाणे यांना नोटीस काढली व गु.क्र.१६५/२०१९ चे तपास कागदपत्रे न्यायालयात सादर करण्याचे आदेश दिले.पुढील सुनावणी ३१ जुलै रोजी ठेवण्यात आली आहे.याचिकाकर्त्यांच्या वतीने ऍड.सतीश तळेकर व अजिंक्य काळे काम पाहत आहे तर शासनाच्या वतीने एम. नेर्लीकर काम पाहत आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close