नगर जिल्हा
शेकडो की.मी.चा प्रवास करून हा तांडा निघाला गावाकडे !
संपादक-नानासाहेब जवरे
साकुरी-(प्रतिनिधी)
मुंबई येथे आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी गेलेल्या कुटुंबाचा टाळेबंदी नंतर रोजगार उपलब्ध नसल्याने पोटापाण्याचा प्रश्न उभा राहिलेल्या ने थेट मुंबई ते शिर्डी मार्गे २५० किलोमीटरचा आठ दिवसांत पायी प्रवास करुन सुजलेल्या पायामुळे व पोटभर न मिळणारे अन्न अठरा विश्व दारिद्र्य अंगावरचे कपडे व पिण्याच्या पाण्यासाठी असलेला हंडा व झोपण्यासाठी असलेला बिछाणा हाच संसार असलेले एक कुटुंब शेकडो की.मी.अंतरावरील खांडवा आपल्या मूळगावी निघाले असून कोरोणाच्या धाकाने त्यांना कोणीही आश्रय देत नसल्याची धक्कादायक माहिती अखिलेश मौर्य यांनी दिली आहे.
मध्यप्रदेशातील खंडवा येथील ग्रामीण भागातील तीन भावाचे कुटुंब मुंबईत मिळेल त्या बांधकामांवर काम करत होते २४ मार्च या तारखेला देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदीची घोषणा झाली अनेकांची काम बंद पडली. गावाकडे जाणारी रेल्वे बंद झाली पोटाचा प्रश्न “आ”उभा राहिला. काही दिवस वाट बघितली पण पोटाचा प्रश्र्न उभा राहिल्याने लहान मोठ्या मुलाबाळांना बरोबर घेऊन थेट पायीच प्रवास सुरू केला.
मध्यप्रदेशातील खंडवा येथील ग्रामीण भागातील तीन भावाचे कुटुंब मुंबईत मिळेल त्या बांधकामांवर काम करत होते २४ मार्च या तारखेला देशात टाळेबंदीची घोषणा झाली अनेकांची काम बंद पडली. गावाकडे जाणारी रेल्वे बंद झाली पोटाचा प्रश्न “आ”उभा राहिला. काही दिवस वाट बघितली पण पोटाचा प्रश्र्न उभा राहिल्याने लहान मोठ्या मुलाबाळांना बरोबर घेऊन थेट पायीच प्रवास सुरू केला. दिवसा मिळालेले अन्न व रोजचा पायी प्रवास यामुळे मायभुमीच्या ओढीने निघालेल्या कुटुंबाकडे बघितल्यावर मानसाला पाझर सुटल्या शिवाय राहणार नाही. अनेक खेड्यातील गावातुन जाताना कोणीहीं आजाराच्या धाकाने आश्रय देत नाही.यामुळे मजल दर मजल करत पायांना सुज असताना हे हतबल कुटुंब शिर्डीनजीक आढळून आले आहे.कोरोणा आजाराची दाहकता व टाळेबंदीची मोठी किंमत या लोकांना मोजावी लागते आहे. जिल्हाबदी असताना व ज्या त्या ठिकाणी च या कामगारांना भोजन व निवासाची व्यवस्था होईल असे सरकार जरी सांगत असले तरी यांची माहिती या लोकांना मिळाली नसल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. नगर मनमाड रोडच्या कडेने अशी अनेक कुटुंबे निघाली असताना प्रशासनाने या लोकांची काळजी घेण्याची गरज निर्माण झाली असून अशा पायी निघालेल्या कुटुंबाकडे जिल्हा प्रशासनाने गंभीर पणे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.या लोकांना आधार देऊन प्रशासनाने पाठबळ देण्यासाठी पुढे आले पाहिजे असा या कुटुंबातील सदस्यांची मागणी आहे.