नगर जिल्हा
..या महिला कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांना केली शिक्षा !
संपादक-नानासाहेब जवरे
नांदुर्खी-(प्रतिनिधी)
राज्यात व देशात कोरोना विषाणूने कहर उडवून दिला आहे नगर जिल्ह्यात २६ रुग्ण तर राहाता तालुक्यातही एक रुग्ण आढळुनही ग्रामस्थांत अजूनही या बाबत गांभीर्य येत नसल्याचे पाहून अशा नाठाळ ग्रामस्थांना भर चौकात शिक्षा करण्याचे काम राहाता तालुक्यातील महिला ग्रामसेवक सौ.आवटे व तलाठी सौ. देवकर यांनी सुरु केल्याने अनेकांना उठाबशा काढण्याचा अनास्था प्रसंग गुदरला आहे.याची ग्रामस्थांनी चांगलीच दहशत घेतली आहे.
राहाता तालुक्यात एक नागरिकास कोरोनाची लागण झाल्याचे प्रशासनाने जाहीर केल्याने प्रशासन चांगलेच सावध झाले आहे.व त्यांनी कडक भूमिका घेण्यास प्रारंभ केला आहे.कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आलेल्या आहे त्यामुळे विनाकारण कोणी घराबाहेर पडू नका असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे.मात्र त्याला काही नाठाळ ग्रामस्थ साथ देत नसल्याने त्यांना वठणीवर आणण्यासाठी काही अधिकाऱ्यांनी शिक्षा फर्मावली आहे.
राहाता तालुक्यात एक नागरिकास कोरोनाची लागण झाल्याचे प्रशासनाने जाहीर केल्याने प्रशासन चांगलेच सावध झाले आहे.व त्यांनी कडक भूमिका घेण्यास प्रारंभ केला आहे.कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आलेल्या आहे त्यामुळे विनाकारण कोणी घराबाहेर पडू नका असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे. तरी देखील लोक विनाकारण बाहेर रस्त्यावर फिरतात व तोंडाला मास्क लावत नाही या प्रशासनाच्या नियमांचं पालन करत नाही. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने चांगले पाऊल उचलले आहे. नांदुर्खी गाव शंभर टक्के बंद ठेवण्यासाठी प्रशासनाने निर्णय घेतला आहे त्यामध्ये नांदुर्खी चौफुली रस्त्यावर व परिसर मध्ये जे कुणी नागरिक रस्त्यावर फिरत असेल व मास्क लावलेले नसेल त्यांना महसूल विभागाचे अधिकारी तलाठी देवकर मॅडम ग्रामसेवक आवटे मॅडम यांनी जे कोणी नागरिक रस्त्यावर दिसेल व मास्क लावलेले नसेल त्यांना जागेवर थांबून हे चांगले स्वरूपाची शिक्षा म्हणून जागे वर उठ बस्या काढायला लावले आहे. परत रस्त्याला दिसल्यास तुमची गाडी जप्त होईल पुढील शिक्षा घेण्यास तयार रहा अशी तंबीत राहाता महसूल अधिकारी तलाठी देवकर मॅडम, ग्रामसेवक आवटे मॅडम यांनी नागरिकांना दिली आहे.त्यामुळे आता विनाकारण घराबाहेर पडणे लोकांना चांगलीच महागात पडणार आहे. ही कारवाई करत असताना महसूल अधिकारी महसूल कर्मचारी दिपक वाघे,गोसावी योगेश, अर्जुन आरणे, गोसावी पुंजाहरी, प्रशासनाला सहकार्य करणारे तरुण कार्यकर्ते सागर चौधरी, तुषार चौधरी प्रल्हाद चौधरी आदींनी सहकार्य केले आहे.