नगर जिल्हा
खा.वाकचौरे यांनी घेतली…या माजी मंत्र्यांची भेट
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
शिर्डी लोकसभा मतदार संघाचे नवनिर्वाचित खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी नुकताच विजय मिळवला असून त्या निमित्त त्यांनी नेवासा विधानसभा मतदार संघाचे आमदार व माजी मंत्री शंकरराव गडाख यांची सदिच्छा भेट घेतली असून निवडणुकीत केलेल्या मदतीबाबत धन्यवाद दिले आहे.दोन्ही नेत्यांनी उबाठा सेनेचे जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सुमारे एक तास चर्चा केली आहे.त्यांनतर त्यांनी शनी शिंगणापूर येथे जाऊन भगवान शनेश्वराच्या ठिकाणी विधिवत पूजा केली आहे.
शिर्डी लोकसभा मतदार संघाचे महाआघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांनी ०४ लाख ७६ हजार ९०० मते मिळवत सत्ताधारी गटाचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्यावर ५० हजार ५२९ मतांची आघाडी घेऊन विजयी झाले आहे.त्यांच्या या विजयात नेवासा तालुक्याचे मोठे योगदान राहिले असून त्या निमित्त त्यांनी माजी मंत्री शंकरराव गडाख यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आहे.
सदर प्रसंगी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब खेवरे,जेष्ठ नेते विश्वासराव गडाख,निळवंडे कालवा कृती समितीचे संस्थापक नानासाहेब जवरे,संघटक नानासाहेब गाढवे,उदयन गडाख,रोहित वाकचौरे आदी मान्यवर उपस्थित होते.
सदर प्रसंगी माजी मंत्री गडाख यांनी नवोदित खा.वाकचौरे यांच्या विजयाबद्दल शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला आहे.
दरम्यान त्यानंतर खा.वाकचौरे यांनी नेवासा तालुक्यातील शनी शिंगणापूर येथील देवस्थानला भेट दिली असून तेथे भगवान शनैश्वरास अभिषेक व विधिवत पूजन व दर्शन घेतले आहे.त्यांचा शिंगणापूर संस्थानच्या वतीने शाल श्रीफळ देऊन व शनी देवस्थानची माहिती पुस्तिका देऊन सत्कार करण्यात आला आहे.