शैक्षणिक
कोपरगाव तालुक्यातील…या गावात ‘आषाढी वारी’चे आयोजन संपन्न

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील उक्कडगाव येथील अण्णासाहेब लावरे सेवा संस्थेचे शिवअमृत कनिष्ठ महाविद्यालयात राज्याचे धार्मिक अधिष्ठान असलेल्या ‘आषाढी एकादशी’ निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले होते.
आषाढी महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी आषाढी एकादशी म्हणतात.हा दिवस महाराष्ट्रात धार्मिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाचा मानण्यात येतो.या दिवशी देव निद्रिस्त होतात अशी समजूत आहे.महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक लोक विठ्ठल नामाचा गजर करीत आषाढी एकाद्शीला पायी चालत येतात.हिलाच आषाढी वारी म्हणतात ती उक्कडगाव येथे उत्साहात संपन्न झाली आहे.
आषाढी महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी आषाढी एकादशी म्हणतात.हा दिवस महाराष्ट्रात धार्मिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाचा मानण्यात येतो.या दिवशी देव निद्रिस्त होतात अशी समजूत आहे.महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक लोक विठ्ठल नामाचा गजर करीत आषाढी एकाद्शीला पायी चालत येतात.हिलाच आषाढी वारी म्हणतात.चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात.राज्यातही हा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न होत असतो.कोपरगाव तालुक्यातील उक्कडगाव येथील शिवमृत महाविद्यालय व शिव बालक मंदिर स्कूल येथेही तो उत्साहात संपन्न झाला आहे.
या दिंडीच्या निमित्ताने चिमुकल्या मुलींच्या साडी चोळीचा पेहराव विशेष आकर्षण ठरत होता.शाळेपासुन पांडूरंगाच्या मंदिरा समोरील प्रांगणात भजने आणि फुगड्यांनी आणि विठु नामाच्या गजराने अल्पकाळ आसमंत दुमदुमुन गेला होता.यात ग्रामस्थ भजनी मंडळींनी देखील मोठ्या उत्साहात सभाग नोंदवला आहे.त्यानंतर शाळा ते उक्कडगाव देवी मंदिर या दरम्यान दिंडीने गावातील मंदिराकडे प्रस्थान केले.
सदर प्रसंगी शाळेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी लावरे,प्राचार्य देशमुख पी.एस.शिक्षक,शिक्षतेतर कर्मचारी,विद्यार्थी आदिंनी या उपक्रमासाठी परिश्रम घेतले आहे.