नगर जिल्हा
…या तालुक्यात जरांगे पाटील यांची जंगी सभा होणार-माहिती

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
मराठा समाजास आरक्षण मिळावे या साठी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचे प्रमुख उपस्थित रविवार दिनांक ०८ ऑक्टोबर रोजी दुपारी १२:३० वाजता राहाता येथे जाहीर सभा आयोजित केली असल्याची माहिती कमलाकर कोते यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा.अन्यथा पुन्हा आंदोलन सुरु करणार असल्याचा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे.यासाठी गाव गावात जनजागृती सभा सुरु आहे.त्या नियोजनानुसार महसूल मंत्र्यांच्या राहाता तालुक्याच्या मतदार संघात दि.०८ ऑक्टोबरला सभा नियोजित केली आहे.
आपल्या अंतरवली येतील आंदोलनानंतर जरांगे पाटील हे महाराष्ट्राचा दौरा करत आहेत.प्रत्येक ठिकाणी त्यांना मोठा पाठिंबा मिळत आहे.त्यामुळे राहाता तालुक्यातदेखील तेवढ्याच ताकदीची सभा व्हावी म्हणून सकल मराठा समाजाच्या वतीने प्रत्येक गावामध्ये सभेचे फलक लावण्यात येणार आहेत.सभेसाठी कोपरगावसह राहाता तालुक्यातील सर्व गावांसह तालुक्यातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याची माहिती कमलाकर कोते यांनी दिली आहे.
या सभेत जरांगे पाटील हे,”आम्ही आमच्या हक्कासाठी अनेक वर्षांपासून लढत असल्याचे सांगत आहे.मात्र,सरकार दखल घेत नसल्याने अहिंसा मार्गाने १७ दिवस अमरण उपोषण केले.या आगेदरही उपोषण केले होते.मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा.अन्यथा पुन्हा आंदोलन सुरु करणार असल्याचं इशारा दिला आहे.यासाठी गाव गावात जनजागृती सभा सुरु असल्याचा त्यांचा दावा आहे.त्या नियोजनानुसार महसूल मंत्र्यांच्या राहाता तालुक्याच्या मतदार संघात दि.०८ ऑक्टोबरला सभा नियोजित केली आहे.
दरम्यान या कार्यक्रमासाठी शिर्डीतील मराठा समाज यांचे वतीने आर्थिक मदत देण्यात आली असल्याचा दावा केला असून राहाता व कोपरगाव तालुक्यातील सर्व समाज बांधवानीं या समाज कार्यासाठी शक्य असेल ते आर्थिक सहकार्य करावे असे आवाहन करून त्यांनी सामाजिक संकेत स्थळावर देणगीसाठी स्कॅनर प्रसिद्धीस दिला आहे त्यावर मदत करावी असे आवाहन करून या सर्व जमा रकमेचा हिशोब कमिटीच्या वतीने सामाजिक संकेतस्थळावरून प्रसिद्धीस दिला जाणार असल्याचे स्पष्ट करून मराठा समाजातील तरुणांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची हाक कमलाकर कोते यांनी शेवटी दिली आहे.